उजाला योजना : पुण्याची आघाडी, नागपूर आणि कोल्हापूरचीही उत्तम कामगिरी

Date:

नवी दिल्ली/ मुंबई, 15 जुलै 2022

केंद्र सरकारने ऊर्जा बचतीसाठी आरंभ केलेल्या ‘उजाला’ योजनेला महाराष्ट्रासह देशात चांगले यश मिळाले आहे. अफोर्डेबल एलईडी फॉर ऑल (उजाला) योजनेद्वारे परवडणाऱ्या किंमतीत उर्जा बचत उपकरणे उपलब्ध करून देणाऱ्या उन्नत ज्योती कार्यक्रमाची सुरुवात 5 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. अल्पावधीत, हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठा शून्य अनुदानित देशांतर्गत प्रकाश कार्यक्रम म्हणून विकसित झाला आहे. या अंतर्गत   30 जून 2022 पर्यंत देशभरात 36.86 कोटींहून अधिक एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात उजाला योजनेच्या अंमलबजावणीत  चांगले यश मिळाले आहे. राज्यात आतापर्यंत जवळपास  2.2 कोटी   एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले आहे. यात  पुणे (शहर) परिसराबरोबरच मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विक्रमी एलईडी ट्यूब/बल्ब यांचे वितरण करण्यात आले आहे. पुणे शहर विभागात 30,49,369, मुंबई विभाग-10,00,894, कोल्हापूर 12,48,270 असे एलईडी ट्यूब/बल्ब वितरीत करण्यात आले आहेत.  याशिवाय  औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती या राज्याच्या विविध विभागांमधील  शहरांमध्ये प्रत्येकी  8 लाखांपेक्षा अधिक एलईडी ट्यूब/बल्ब वितरीत करण्यात आले आहेत. राज्यात वितरित करण्यात आलेल्या एलईडी ट्यूबलाईटची संख्या 5,31,133 एवढी तर एलईडी पंख्यांची संख्या 1,86,211 एवढी आहे.

A picture containing mapDescription automatically generated

ऊर्जा बचत, कार्बन उत्सर्जन टाळणे, ग्राहकांचे वीज बिल कमी होणे हे एलईडी वापराचे दृश्य परिणाम दिसून आले आहेत. तसेच सर्वांसाठी ऊर्जा हे लक्ष्य यामुळे साध्य झाले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील वीज बिलांमध्ये अंदाजे 19,000 कोटी रुपयांची आणि महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 1,140 कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.

उजाला योजनेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर देशातील एलईडी बल्बच्या किमतीही कमी झाल्या आहेत. यापूर्वी 300-350 रुपये किंमतीला असलेला एलईडी बल्ब  आता 70-80 रुपयांमध्ये मिळत आहे. या योजनेंतर्गत एलईडी बल्ब वितरीत करण्यात आल्यामुळे  ऊर्जेची वार्षिक बचत  झाली आहे, यामुळे राज्यातील अनेक कुटुंबांचे वीज बिल कमी होण्याबरोबरच घर अधिक प्रकाशमान झाले आहे. याशिवाय, सर्वोच्च वीज मागणी काळात (peak demand) संपूर्ण देशभरात 9,585 मेगावॅट इतकी  तर महाराष्ट्रात 572  मेगावॅट इतकी  वीज मागणीत  घट झाली. या योजनेमुळे देशातील वार्षिक कार्बन उत्सर्जन 38.77 दशलक्ष टन इतके महाराष्ट्रात 2.3 दशलक्ष टन असे  लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

उजाला- महाराष्ट्रातील जून 2022 पर्यंतची आकडेवारी

2,19,86,569 एलईडी बल्ब वितरण

• एकूण एलईडी पंखे वितरण (जून 2022) – 1,86,211

• एलईडी ट्यूबलाईट वितरण (जून 2022)- 5,31,133

 • सर्वोच्च वीज  मागणी काळ- 572 मेगावॉट इतकी  मागणीत घट

• प्रतिवर्ष कार्बन उत्सर्जन कपात – 23,12,817 टन

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...