मुंबई, ता. २७ : आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मंदिरात अर्पण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चांदीच्या पादुकांचे आज उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी पूजा करून वंदन केले. लवकरच या पादुका भवानी मातेला अर्पण करण्याचा संकल्प डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केला आहे.
काल दिनांक २६ जुलै २०२२ रोजी पुण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर शिवसेनेच्यावतीने केलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केलेल्या महाआरतीचा प्रसाद दिला होता. तो आज उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी मनोभावे ग्रहण केला. या आरतीच्या निमित्ताने पुण्यात खास तयार केलेला सव्वा किलोचा विशेष मोदकही यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे कुटुंबियांना दिला.
उद्धव ठाकरेंना उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे. शिवसेनेची वाटचाल अधिक दिमाखदार होवो, अशा शुभकामना आज शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत.