४७ जागां ऎवजी ओबीसींसाठी फक्त ४६ जागांवर आरक्षण; राजकीय पक्षांना का जाग येईना ?

Date:

पुणे- पुणे महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७३ झाली असून ओबीसींसाठी नियमानुसार २७ टक्के म्हणजे ४७ जागा आरक्षित ठेवणे भाग असताना ४६ च जागा ठेवल्याने आश्चर्य व्यक्त होत तर आहे पण राजकीय पक्षांना आता का जग येईना ? असाही सवाल केला जातो आहे.

सुमारे दीड वर्षापासून राजकीय आरक्षण गमावलेल्या इतरमागास वर्गीय [ओबीसी] समाजाला, जयंत बांठिया आयोगाच्या शिफारशी नुसार २७ % आरक्षण बहाल करण्यात आले.मागील २०१७ च्या मनापा निवडणुकीत पुण्यात १६२ जागा होत्या त्यावेळीही २७% च्या प्रमाणानुसार ४३.७४ म्हणजे ४४ जागांचे आरक्षण ओबीसी प्रवर्गाला मिळणे असे अपेक्षित होते , मात्र त्यावेळीही ओबीसींना १ जागा कमी देण्यात आली होती.यावेळी ३४ गावे नव्याने मनापा मध्ये समाविष्ट झाल्यामुळे नगरसेवकांची एकूण संख्या १७३ झाली आहे .१७३ जागांपैकी २७ % जागा या ओबीसी समाजासाठी आरक्षित असणार आहेत, मात्र यावेळी सुद्धा टक्केवारीच्या प्रमाणत येणारी संख्या अपूर्णांकात आहे , नियमानुसार ४६.७१ जागांवर ओबीसी आरक्षण आहे . जेंव्हा अपुर्णांकी संख्या ०.५ पेक्षा अधिक असते तेंव्हा त्यापुढील संख्या पूर्णांकात धरली जाते . ४६ पूर्ण आणि ०.७१ ही अपूर्णांकी संख्या आहे .०.७१ ही संख्या अर्ध्यापेक्षा अधिक मुल्यांची असल्यामुळे , नियमा प्रमाणे १ पूर्ण जागा देणे अनिवार्य आहे . तरीही निवडणूक आयोग याही वर्षी ४७ जागा आरक्षित ठेवण्या ऐवजी ४६ जागीच ओबीसींना आरक्षण दिले आहे .

आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे . बांठीया आयोगाच्या अहवालाचे टंकलेखन सुरु असताना शिंदे -फडणवीस सरकार सत्तेवर आले . सत्तेवर असताना ओबीसी आरक्षण मिळाले, हा धागा पकडून शिंदे – फडणवीस सरकारने ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून आरक्षणाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला .अपुर्णांक संख्येचे गणित पुण्या बरोबरच अनेक ठिकाणी चुकत आहे , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी समाजाला आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळत नाही .

पुण्याप्रमाणे अनेक ठिकाणी अशी परस्थिती आहे . अनेक ठिकाणी ओबीसी समाजाला एक जागा कमी मिळत असेल, तर हा ओबीसी समाजावर अन्याय आहे , असे मत आपचे विजय कुंभार यांनी व्यक्त केले आहे . मात्र श्रेयासाठी सगळ्यात पुढे असणाऱ्या राजकीय पक्षांची या प्रश्नाबाबत अनास्था दुर्दैवी आहे .
आम आदमी पक्ष या प्रश्ना बाबत पाठपुरावा करून ओबीसी समाजाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत लढत राहील , असे आपचे राज्य संघटक आणि पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष...

किमान ८ कोटीची उलाढाल असलेले केबलवाले आणि होर्डिंग वाले यांच्यासाठी स्थायी विरोधात लढायला ‘फौज’ तय्यार

कोट्ट्याधीशांच्या व्यवसायाला शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवू पाहणाऱ्या निर्णयांना...

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...