Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उडचलो संपूर्ण ‘फौजी परिवाराला’ सेवा पुरवणार

Date:

 सेना कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींसाठी वयाची अट रद्द केली२५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती देखील उडचलोच्या सेवासुविधांचा लाभ घेऊ शकणार ~

पुणे१४ सप्टेंबर २०२२:  भारताचे सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना सेवा पुरवणारी, आघाडीची ग्राहक-तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनी उडचलोने सेना कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना लागू असलेली वयाची अट रद्द करून आता सर्व डिपेन्डन्ट्सना आपल्या सेवाकक्षेत सामावून घेतले आहे. उडचलोच्या दहाव्या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली आहे.  आता यापुढे २५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे डिपेन्डन्ट्स देखील उडचलोचे लाभ, विशेष सूट मिळवून परिवाराला भेटताना आणि भविष्यातील सुट्ट्यांचे नियोजन करताना लक्षणीय रकमेची बचत करू शकतील.  संपूर्ण फौजी परिवाराला सेवा पुरवण्याच्या आणि त्या सर्वांना एकाच छत्राखाली आणून समान ओळख व समान वंश असलेल्या विशेष युजर समूहाला अपवादात्मक लाभ मिळवून देण्याच्या व्हिजनला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजवर उडचलोच्या एक्सक्लुसिव्ह पोर्टलवर फक्त सक्रिय व सेवानिवृत्त सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर थेट अवलंबून असलेल्या व्यक्तींना सेवा पुरवल्या जात होत्या. आता सेना कर्मचाऱ्यांच्या, २५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलगा आणि मुलगी यांना देखील उडचलो फौजी परिवारात सहभागी करवून घेण्यात आले आहे. यामुळे आता या स्टार्ट-अपची ग्राहक संख्या २.८ मिलियनवरून ३.८ मिलियन इतकी वाढेल.

संरक्षण दलांमधील लोकप्रिय उडचलो हे भारतीय विमान वाहतूक उद्योगातील एक श्रेणी निर्माता असून त्यांनी ‘डिफेन्स फेयर्स’ ही संकल्पना पहिल्यांदा आणून या क्षेत्राला या ग्राहकांची ओळख पहिल्यांदा करून दिली.  हळूहळू उडचलोने प्रवास, घर, आर्थिक सेवा, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि युटिलिटी बिल पेमेंट सुविधा यांचा देखील आपल्या सेवांमध्ये समावेश केला आहे. सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे जीवन सहज, सुरळीत व्हावे यासाठी आपल्या सेवांमार्फत त्यांना सुविधा प्रदान करणे हे उडचलोचे उद्दिष्ट आहे.  ७०% एक सर्वात जास्त एनपीएस आणि ९०% उत्कृष्ट सीएसएटी असलेल्या उडचलोच्या ग्राहकसेवा या क्षेत्रातील सर्वोत्तम असून तब्बल २.८ मिलियन सेना कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती त्यांच्या सेवांचा लाभ घेत आहेत.

उडचलोचे संस्थापक आणि सीईओश्री. रवी कुमार म्हणाले, संरक्षण समुदाय म्हणजे एकमेकांशी अतिशय घट्ट जोडले गेलेले कुटुंब आहे आणि त्यांचे हे संबंध संपूर्ण जीवनभरासाठीचे आहेत! प्रत्येक मुलाची स्वप्नेउद्दिष्ट्ये पूर्ण व्हावीत यासाठी संपूर्ण समुदाय त्याच्या पाठीशी उभा राहतोमग ती उद्दिष्ट्ये संरक्षण दलाशी संबंधित असो वा नसो. एक प्रचंड मजबूत राष्ट्र निर्माण करणे‘ हे एकच ध्येय या संपूर्ण समुदायासमोर आहेसमुदायामध्ये जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर हे ध्येय बिंबवले जाते. या सेवांच्या कक्षेत आपल्या मुलामुलींनाही सामावून घ्यावे अशा विनंत्या आमच्याकडे सतत केल्या जात होत्या.  याआधी उडचलोने एयरलाईन्सच्या करारानुसार डिफेन्स फेयर्स‘ दिले होते आणि सरकारने आखून दिलेल्या व्याख्येमध्ये राहून त्याचे पालन करणे आम्हाला भाग होते. आज उडचलो अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रदान करते आणि आता आम्ही या सेवा संपूर्ण परिवारासाठी उपलब्ध करवून देत आहोत.  मी स्वतः एका सेना कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याने या सर्व भावना मी खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.”

उडचलोची सुरुवात २०१२ साली झाली, तेव्हापासून त्यांनी प्रवास, आर्थिक सेवा, घर, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि विविध सेवासुविधांची बिले यांचा समावेश आपल्या सेवांमध्ये करून आपल्या ग्राहकांना खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करवून दिल्या आहेत. गेल्या १० वर्षात या स्टार्टअपने आपल्या देशाच्या सैनिकांना विशेष दरांमध्ये उत्पादने व सेवांचा लाभ मिळावा यासाठी देशभरात ७० पेक्षा जास्त आउटरीच सेंटर्सचे स्वतःचे विशाल नेटवर्क उभारले आहे. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...