अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकांच्या निकालापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमधील हिंसेदरम्यान ट्विटर, फेसबुकने ट्रम्प यांचे अकाउंट ब्लॉक केले आहे. ट्विटरने इशारा दिला आहे की, ट्रम्प यांनी भविष्यात नियम मोडल्यास त्यांचे अकाउंट नेहमीसाठी बंद केले जाऊ शकते.
फेसबुकने म्हटले – ट्रम्प यांच्या व्हिडिओने हिंसा उसळण्याचा धोका
संसदेच्या बिल्डिंगमध्ये हिंसा आणि ट्रम्प यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंबंधीत 3 ट्विटही हटवण्यात आले आहेत. असे पहिल्यांदाच झाले आहे. यापूर्वी फेसबुक आणि यूट्यूबने ट्रम्प यांचा व्हिडिओ रिमूव्ह केला होता. फेसबुकचे व्हाइस प्रेसिडेंट (इंटेग्रिटी) गुऐ रोजेन यांनी म्हटले की, ही एमरजेंसी आहे.
ट्रम्प यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते – निवडणुकीत धोका झाला
कॅपिटल हिलमध्ये हिंसेनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते आपल्या समर्थकांना म्हणत होते – मला माहिती आहे तुम्ही दुःखी आहात. आपल्याकडून निवडणूक हिसकावून घेण्यात आली. यावेळी निवडणुकीत धोका झाला. मात्र आपण त्या लोकांच्या हातात खेळू शकत नाही. आपल्याला शांतता ठेवायची आहे. तुम्ही घरी परता.

