पुणे -महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) 2016-17 या आर्थिक वर्षात 240 कोटी रुपये तोटा झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी पुणे महापलिकेकडून संचलन तूट म्हणून 144 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावला मुख्यसभेत आज एकमताने मंजुरी देण्यात आली.
महापालिकेकडून पीएमपीला दरमहा १२ कोटी रुपयांचे हप्ते १२ महिने देण्यात येणार असून पीएमपीच्या ताळेबंदाचे लेखापरीक्षण झाल्यानंतर शेवटचा हप्ता दिला जाणार आहे.
पीएमपीमध्ये पुणे महापालिकेचा ६० टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. त्यामुळे कंपनीच्या संचलन तुटीचा खर्च आणि बस खरेदीवरील करांची रक्कम दोन्ही महापालिकांनी आपापल्या हिश्श्यानुसार पीएमपीला द्यावी, असा आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये दिला होता. पीएमपीला २०१६-१७ या आर्थिक वर्षात २४० कोटी रुपयांची संचलन तूट आली आहे. पुणे महापालिकेच्या हिश्श्यानुसार १४४ कोटी रुपये पीएमपीला देणे आहे. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरी नंतर मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता.
या सभेत पीएमपीएमएल चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी केलेले संपूर्ण विवेचन पहा आणि ऐका…