कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

बारामती दि. 5 : बारामती शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही, त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्यु‍बली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, रूई ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रूग्ण संख्या काही प्रमाणात कमी होत आहेत परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रूग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथील करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहीली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रूग्ण संख्या 5 टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी इंजेक्सशनचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी असेही ते म्हणाले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कन्हेरी येथे उद्यानाचे भूमिपूजन
बारामती येथील कन्हेरी गावामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोविड 19 नियमांचे पालन करून वन विभागाकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक पुणे राहूल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती राहूल काळे व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 2 रूग्णवाहिकेंचे लोकार्पण
स्टेट बँक ऑफ इंडिया फौंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ‘एसबीआय’चे मुख्य महाव्यवस्थापक अजय कुमार सिंग, महाव्यवस्थापक श्रीमती सुखविंदर कौर उपस्थित होते. तसेच मयुरेश्वर प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या मार्फत 15 सॅनिटायझर व सुपे येथील 85 निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तींना प्रत्येकी 1001 रुपयांचा धनादेशाचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे सुशांत जगताप व तुषार हिरवे उपस्थित होते. याचबरोबर मॅग्नम एन्टरप्रायझेस यांच्याकडून कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी लागणारी काही औषधे व कोविडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री मदत म्हणून देण्यात आली. बारामती येथील हॉटेल डोसा प्लाझाचे योगेश भगवान पानसरे व दिनेश मोहन पानसरे यांच्याकडून देखील कोविड 19 साठी मदत म्हणून 25 हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...