वैकुंठात नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देणे व अपूर्ण कामे पूर्ण करणे हीच महेश लडकत यांना श्रद्धांजली – संदीप खर्डेकर.

Date:

वैकुंठातील व प्रभागातील महेशरावांच्या अपूर्ण कामांसाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही – उपमहापौर सरस्वती शेंडगे व नगरसेविका स्मिता वस्ते यांचे वचन.
पुणे- वैकुंठातील प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि येथे येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देणे हीच महेश लडकत यांना समर्पक श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन येथे भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकरयांनी केले. येथील कामांबाबत महेश लडकत यांच्याशी वारंवार चर्चा होत असे, त्यांनी त्यांच्या व खासदार गिरीश बापट यांच्या निधीतून अनेक कामे मार्गी लावली,मात्र त्यांच्या नियोजनातील अनेक अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करणे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृती जागविण्यासारखे होइल असेही ते म्हणाले.

नगरसेवक महेश लडकत यांच्या प्रथम मासिक स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प सोडला जावा यासाठी वैकुंठ परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते..यावेळी आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक उपमहापौर सरस्वती शेंडगे,नगरसेविका स्मिता वस्ते,महेशरावांचे बंधू शैलेश लडकत,भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव,युवा मोर्चा सरचिटणीस राजू परदेशी,उद्यम बॅंकेचे संचालक शिरीष कुलकर्णी,दिनेश गांधी,सीताराम खाडे,मनोज नायर,पतित पावन संघटनेचे दिनेश भिलारे यांच्यासह सर्व कर्मचारी,गुरुजी व महेश लडकत यांचे स्नेही उपस्थित होते.वैकुंठ स्मशानभूमीतील सर्व प्रलंबित कामे तीन महिन्यात पूर्ण करु असे आमदार मुक्ता टिळक यांनी सांगितले.आत्ता याठिकाणी मांडण्यात आलेल्या तक्रारींची मी गांभीर्याने दखल घेतली असून त्याचा पाठपुरावा करुन प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी करुन ही कामे पूर्ण केली जातील,माझे सहकारी हे शैलेश लडकत यांच्याशी समन्वय साधून सर्व विषय मार्गी लावतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे व नगरसेविका स्मिताताई वस्ते यांनी सर्व समस्यांची पाहणी करुन महेश लडकत यांची वैकुंठातीलच नव्हे तर प्रभागातील प्रलंबित कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे वचन दिले व येथे महेशरावां नी केलेले कार्य आम्ही पुढे नेउ असेही त्यांनी स्पष्ट केले.सर्व कर्मचारी व गुरुजींनी विविध समस्यांचा पाढा वाचला.
आज मांडण्यात आलेले अपुरे काम व समस्या ….
१) विद्युतदाहिन्यांच्या ढासळलेल्या विटा दुरुस्त करणे,तसेच विद्युतदाहिनीतील कॉईल ट्रॉली च्या संपर्कात येत असून त्याचा करंट बसत असल्याने ही दुरुस्ती गरजेची आहे.
२) विद्युतदाहिनीच्या मागील बाजूस स्क्रबर जवळ मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असून तेथे दुरूस्ती काम करणे.
३) मृतदेहावर अंत्यविधी केली जाते तेथील छपराला गेलेले तडे व निघालेले प्लॉस्टर दुरुस्त करणे.
४) सर्वत्र पडलेला राडारोडा व सामान उचलणे व स्वच्छता करणे.
५) तिन्ही पाळीत पुरेसे सुरक्षारक्षक नेमणे व बंद असलेले दोन्ही दरवाजे नागरिकां साठी खुले करणे. ( एस एम जोशी पुलाजवळील व नवीपेठे तील )
६) गुरुजींसाठी पास केंद्राशेजारील खोली विश्रांतीगृह म्हणून उपलब्ध करणे.
७) पास केंद्र विद्युतदाहिनीतील इमारतीतून हलवून मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या केबिन मधे सुरु करणे.
८) स्ट्रेचर,कचऱ्याच्या घंटागाड्या / ढकलगाड्या,बसायचे बाक व अस्थींसाठी ट्रे उपलब्ध करणे.
९) अंतर्गत रस्त्यांची व शौचालयांची डागडुजी करणे.
यासह मोबाईल कंपन्यांशी बोलून बूस्टर बसविणे ( सर्व कंपन्यांच्या मोबाईलला रेंज नसल्याने गैरसोय होत आहे ) यासह अनेक छोट्या मोठ्या कामांची पाहणी करण्यात आली.
महेशभाउंची स्मृती जागृत ठेवण्यासाठी त्यांच्या अपूर्ण कार्याची पूर्तता ही अत्यंत संयुक्तिक असल्याचे शैलेश लडकत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...