रात्री बढत्यांवर बदल्या अन सकाळी त्यास स्थगिती- काय आहे राजकारण ?

Date:

मुंबई-राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढती-बदल्यांचा रात्री आदेश होतो आणि सकाळी त्यातील काहींना स्थगिती मिळते, हि बातमी सरकारमधील असमनवय दर्शविणारी होती निर्णय होऊन २४ तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापैकी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली . यामागे कारण होते ठाण्यातील शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी. राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या गृहमंत्रालयाने काढलेले हे आदेश शिंदे यांनी शक्ती वापरून आपल्याला हवे तसे वळवले आणि ठाण्यात आपणच “सरकार’ म्हणून राहणार असल्याचे दाखवून दिले आहे असा दावा सूत्रांनी केला आहे .

सूत्रांच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारने ज्या पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती-बदलीचे आदेश काढले होते त्यात ठाणे जिल्ह्यातील ५ पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पोलिस उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली होती. मात्र २४ तासांतच हा आदेश स्थगित करण्यात आला. उपमहानिरीक्षक दर्जा देऊन ज्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते त्यात महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

१. गृह विभाग हा राष्ट्रवादीच्या अखत्यारीत आहे. मात्र आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या मुख्यमंत्र्यांच्या सहीने होतात. त्यामुळे स्वपक्षीय एकनाथ शिंदे यांच्या होम डिस्ट्रिक्टमधील बदल्यांना मुख्यमंत्र्यांनी चर्चा न करता संमती कशी दिली, असा प्रश्न उपस्थित झाला.

२. बदल्यांचे आदेश जारी होण्याच्या २४ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश परत घेण्यामागे नेमके काय कारण आहे, ही प्रशासकीय चूक आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

स्थगितीचे हे आहे कारण शिवसेनेचा गड असलेल्या ठाणे महापालिकांच्या निवडणुका तांेडावर आहेत. मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. महापालिकेवर त्यांचे वर्चस्व आहे. शिंदे यांना निवडणुकीच्या काळात मर्जीतील पोलिस अधिकारी हवे होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय फिरवण्यास मुख्यमंत्र्यांना भाग पाडले. असा सूत्रांचा दावा आहे.

यापूर्वीही ……..
१. याआधी दहा आयपीएस (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यानंतर त्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बदली घोटाळ्याची चौकशी सुरू असून तो वसुलीचा भाग असल्याचे देखील तपासात समोर आले होते.
२. टाटा कर्करोग रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देण्याचा निर्णय घेतला होता. २४ तासात हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला होता. आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत सदनिका देण्याचा निर्णय झाला होता.
३. फडणवीस सरकारच्या काळात महापालिकेत ४ आणि नगपरिषदेत ३ प्रभाग होते. २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आग्रहामुळे एक- एक प्रभाग केले. परंतु, शिवसेनेच्या आक्षेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप करत ते पुन्हा ३ आणि २ अशी प्रभाग रचना केली.

या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मिळाली स्थगिती गुप्तवार्ताचे उपायुक्त राजेंद्र माने यांची अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर येथे बदली झाली होती. मीरा भाईंदर वसई विरार पोलिस उपायुक्त महेश पाटील यांची बृहन्मुंबई अपर पोलिस आयुक्त वाहतूक विभागात बदली झाली होती. महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची अपर आयुक्त ठाणे शहर प्रशासनात बदली झाली होती. ठाणे एसीबीचे पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले यांची बृहन्मुंबई सशस्त्र पोलिस अपर आयुक्तपदी बदली झाली होती. पालघरचे अधीक्षक शिंदेंची बृहनन्मुंबई अपर पो. आयुक्तपदी बदली झाली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...