पुणे विभागातील 17 लाख 82 हजार 368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 56 हजार 133 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 3 : पुणे विभागातील 17 लाख 82 हजार 368 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 56 हजार 133 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 35 हजार 486 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 279 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 86 हजार 654 रुग्णांपैकी 10 लाख 59 हजार 26 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 385 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.46 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 20 हजार 328 रुग्णांपैकी 2 लाख 5 हजार 951 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 50 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 327 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 765 रुग्णांपैकी 1 लाख 69 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 75 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 574 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76 हजार 473 रुग्णांपैकी 1 लाख 64 हजार 762 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 58 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 94 हजार 913 रुग्णांपैकी 1 लाख 83 हजार 513 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 918 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 917 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 526, सातारा जिल्ह्यात 644, सोलापूर जिल्ह्यात 423, सांगली जिल्ह्यात 913 तर कोल्हापूर जिल्ह्यात 411 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 168 आहे. पुणे जिल्हयामध्ये 744, सातारा जिल्हयामध्ये 405, सोलापूर जिल्हयामध्ये 383, सांगली जिल्हयामध्ये 831 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 805 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 29 लाख 81 हजार 105 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 56 हजार 133 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

