कोव्हॅक्सिनसाठी खा.बापट यांचे केन्द्राला साकडे

Date:

पुणे दि, 26: ( प्रतिनिधी ) कोव्हॅक्सिन या भारतीय बनावटीच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना केली.तसे पत्र बापट यांनी तातडीने डाॅ.हर्ष वर्धन यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी कोव्हॅक्सिन लसीबाबत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. भारत बायोटेक यांनी निर्माण केलेल्या या लसी ला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता घेण्यासाठी जी कार्यप्रणाली आहे त्यात आपण सहभागी व्हावे अशी अपेक्षा बापट यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.कोव्हॅक्सिन घेतलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येत नाही.त्यामुळे पर्यटनाला खीळ बसली आहे. याकडे लक्ष वेधून भारत बायोटेकची ही लस अत्यंत प्रभावी आहे. तिला राष्ट्रीय विषाणू संस्था तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे.या मुद्यावर बापट यांनी भर दिला आहे.
अनेक देश पूर्णपणे लसीकरण केलेल्या परदेशी प्रवाशांना सध्या परवानगी देत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. पर्यटनाला चालना देत आहेत. तथापि कोव्हॅक्सिनला मान्यता नसल्याने भारतातील प्रवासी पर्यटनापासून वंचित राहत आहेत.तसेच अन्य कारणांसाठी परदेशात जाणा-या प्रवाशांनाही अडचणी येत आहेत. म्हणून कृपया आपण भारत बायोटेकच्या प्रस्तावात लक्ष घालावे व जागतिक आरोग्य संघटनेची या प्रस्तावाला मान्यता मिळेल. यासाठी प्रयत्न करावे असे बापट यांनी या पत्रात नमूद केले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. जय शंकर यांनाही स्वतंत्रपणे हे पत्र पाठविण्यात आले आहे.एका पत्रकाद्वारे खा.बापट यांनी ही माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...