पुणे- नीलम गोऱ्हे एक स्त्री हक्क साठी लढणारे व्यक्तिमत्व म्हणून पुण्याला परिचित आहे सामाजिक चळवळीतून त्या शिवसेनेत गेल्या आणि त्यांना तिथे त्यांच्या मानाचं स्थान देखील मिळाले , कोणतेही राजकारण न करता समाजकारणाला जास्तीत जास्त महत्व देणाऱ्या डॉ. गोऱ्हे या पुण्यातील ज्येष्ठ आणि मान्यवर नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती पदी काम करू लागल्या ,पुण्यातील किरण साळी या युवा नेत्याची राजकीय कारकीर्द नीलम गोऱ्हे यांच्या छत्रछायेखाली सुरू झाली. किरण साळी हे नीलम गोऱ्हे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून पुण्यात वावरत होते. एवढेच नाही तर किरण साळी हे नीलम गोऱ्हे यांचे शिष्यच असं म्हटलं जात होतं. मात्र आता किरण साळी हे आता उदय सामंत यांच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी एक झाले आहेत. त्यामुळे पुण्यात उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव टोकाला गेला आहे. त्यातूनच किरण साळी यांनी नीलम गोऱ्हे यांना व्हाट्सअप ग्रुप मधून रिमूव्ह केलं असल्याचे दिसून आले आहे.
पुण्यात एक शिवसेना-युवासेना पत्रकार मित्र नावाचा ग्रुप आहे. या ग्रुप मध्ये अनेक पत्रकार, शिवसेनेचे बडे नेते हे आपले विचार मांडत असतात. नीलम गोऱ्हे देखील या ग्रुपमध्ये अनेक राजकीय, सामाजिक विषयांवर आपली मतं नेहमी मांडत असत. मात्र या ग्रुपमधून आता थेट नीलम गोऱ्हे यांनाच काढून टाकण्यात आले आले आहे. शिंदे गटाचे नेते आणि युवासेनेचे सचिव म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, असे किरण साळी यांनी नीलम गोऱ्हे यांना या ग्रुप मधून रिमुव्ह केले आहे.