- अमन मुल्लाची अष्टपैलू कामगिरी;
पुणे, दि.7 फेब्रुवारी 2021- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अ गटाच्या सामन्यात अमन मुल्ला(59धावा व 2-47) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 22 यार्डस संघाने व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट अकादमीचा 30 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर सुरु असलेल्या अ गटाच्या लढतीत 22 यार्डस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना 22 यार्डस संघाने 45षटकात 9बाद 246धावा केल्या. सलामीची जोडी श्रेयस केळकरने 70चेंडूत 7चौकारांच्या मदतीने 50धावा व नितीश कुकडेजाने 51चेंडूत 7चौकारांच्या मदतीने 38 धावा यांनी पहिल्या गड्यासाठी 108 चेंडूत 87 धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर हे दोघेही बाद झाल्यावर अमन मुल्लाने 58 चेंडूत 59धावा व तेजस तोलसणकरने 61 चेंडूत 47 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 95 चेंडूत 93 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. व्हेरॉक संघाकडून ओम भाबड याने 41 धावात सर्वाधिक 4 गडी बाद केले. ओमला सूरज गोंड(2-20), ओंकार राजपूत(1-29), रोहित चौधरी(1-50) यांनी गडी बाद करून सुरेख साथ दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा डाव 38.3षटकात 216 धावावर संपुष्ठात आला. वरच्या फळीतील फलंदाज यश जगदाळे 14, आदित्य एकशिंगे 10, ओंकार राजपूत हे झटपट बाद झाल्यामुळे व्हेरॉक संघ 16.4 षटकात 6 बाद 89 धावा असा अडचणीत आला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या सूरज गोंडने 86चेंडूत 14चौकारांसह 87 धावा व टिळक जाधव(20धावा)च्या साथीत सातव्या गड्यासाठी 77 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण सावरत असतानाच टिळक जाधव दुहेरी धाव घेताना धावबाद झाला. त्यानंतर सूरजने रोहित चौधरी(39धावा)च्या साथीत आठव्या गड्यासाठी 35 चेंडूत 59धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहोचविले. त्यानंतर सूरज चौधरी झेलबाद बाद झाल्यावर व्हेरॉकचा डाव कोसळला व 22 यार्डस संघाने 30 धावांनी विजय मिळवला. 22 यार्डस संघाकडून गौरव कुमार(2-29), अथर्व शिंदे(2-47), हर्ष खांडवे 2-33, अमन मुल्ला(2-47), अभिजित सावळे(1-27) यांनी अफलातून गोलंदाजी केली. सामन्याचा मानकरी अमन मुल्ला ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गट अ: 22 यार्डस: 45षटकात 9बाद 246धावा(अमन मुल्ला 59(58,9×4), श्रेयस केळकर 50(70,7×4), तेजस तोलसणकर 47(61,4×4,1×6), नितीश कुकडेजा 38(51,7×4), अथर्व शिंदे नाबाद 22, ओम भाबड 4-41, सूरज गोंड 2-20, ओंकार राजपूत 1-29, रोहित चौधरी 1-50) वि.वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 38.3षटकात सर्वबाद 216 धावा(सूरज गोंड 87(86,14×4), रोहित चौधरी 39(28,5×4,1×6), टिळक जाधव 20, यश जगदाळे 14, आदित्य एकशिंगे 10, गौरव कुमार 2-29, अथर्व शिंदे 2-47, हर्ष खांडवे 2-33, अमन मुल्ला 2-47, अभिजित सावळे 1-27);सामनावीर-अमन मुल्ला; 22 यार्डस 30 धावांनी विजयी.

