पुणे- नगरसेवक महेश वाबळे यांच्याकोरोना काळातील कामाची दखल ‘World Book Of Records, London’ कडून घेण्यात आली असून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड चे महाराष्ट्र उपाध्यक्ष महेबूब सय्यद,रूमा सय्यद, आमिर सय्यद ,सचिन ढेरे यांनी याबाबत चे प्रमाणपत्र नुकतेच वाबळे यांना प्रदान केले आहे.
या संदर्भात महेश वाबळे म्हणाले की,’ आपल्या पाठीमागे आपल्या कामाची दखल घेतली गेली आहे, ही भावना प्रचंड सुखावणारी आहे. कोरोना काळात सर्व पातळ्यांवर काम करत असताना याची नोंद ‘World Book Of Records, London’ ने घेतली असून कोरोना काळात केलेल्या कामाची नोंद म्हणून ‘Certificate Of Commitment’ हे कामाची नोंद घेणारे प्रमाणपत्र संस्थेकडून मला देण्यात आले.
जे मी करोना काळात काम केले त्यामध्ये धान्य वाटप असेल,रस्त्यावरील बेघराना जेवणाचे डबे देणे, मास्क वाटप आसेल , पेशंटला ने आण करण्या साठी स्वतः चीअँबुलन्स उपलब्ध करून दिली,हॉस्पिटल मध्ये जागा मिळत नव्हती ती मिळवून देण्याचे काम केले , तसेच दुसऱ्या लाटे मध्ये हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हते त्यावेळी स्वतः च तापुरत्या स्वरूपात हॉस्पिटलची उभारणी केली ,रेमडीसीवरसाठी अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करून मिळवून दिले,स्वतः लसीकरनासाठी दवाखाने उपलब्ध करून दिले ,
‘World Book of Records’ मधील ही नोंद माझ्या वैयक्तीक नव्हे तर केलेल्या सामूहिक प्रयत्नांची आहे , असे मी मानतो. कोरोना काळात विविध घटकांनी मोलाची साथ दिली, न डगमगता भक्कमपणे उभे राहिले, त्यासर्वांच्या हे कामाचे मोल आहे .

