दर महिन्याला पैसे जमा करुन सोन्याचे कडे अर्पण
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्षभर पैसे जमवून शारदा गजाननासाठी सोन्याचे कडे तयार केले. तब्बल १० तोळे सोने असलेले हे कडे असून उत्सवाच्या पहिल्या दिवशी गणरायाला हे कडे अर्पण करण्यात आले.
अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंडईकरांचे आराध्य दैवत असलेल्या शारदा गजाननाला विविध आभूषणांनी सजविण्यात आले आहे. त्यामध्ये आता या सोन्याच्या कड्याची भर पडणार आहे.
अखिल मंडई मंडईच्या केवळ कार्यकर्त्यांनी वर्षभरापासून जमतील त्या पद्धतीने पैसे जमा केले. २४ कॅरट सोन्यापासून हे कडे तयार करण्यात आले असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामधे कड्याच्या मध्यभागी सूर्य आणि ओम चे शुभचिन्ह साकारले आहे.