“द टच अप, रेट्रो द गोल्डन एरा” राज्यस्तरीय स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात

Date:

स्पर्धेच्या माध्यमातून महिलांमधे स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या ऊद्देश. 

पुणे –अभिजीत जोशी मेमोरियल फाऊंडेशन, मिडास टच इन्स्टिट्यूट आणि सिंफनी इवेंट्स नाईन यांच्या संयुक्त विद्यमाने “द टच अप, रेट्रो द गोल्डन एरा” या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच घोले रस्त्यावरील ऐलिजियम बँक्वेटच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून महिला वर्गात स्तनांच्या कर्करोगा विषयी जागरूकता निर्माण केली जाणार असून तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. मधुबाला ते माधुरी दिक्षित पर्यन्तची कोणतीही अभिनेत्री रंगभुषा आणि केशभूषे च्या माध्यमातून साकारून आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी सौंदर्यतज्ञांना  या अनोख्या स्पर्धेतून दाखवता येणार आहे.

मिडास टच इन्स्टिट्यूट च्या डॉ. अंजली जोशी आणि सिंफनी इवेंट्स नाईन च्या संकल्पनेतून आयोजित केल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेच्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधून प्राथमिक फेऱ्या घेतल्या जाणार असून त्यातून निवड झालेल्या विजेत्यांना मार्च २०२१ रोजी पुण्यात होणाऱ्या महा अंतिम फेरीत सहभागी होता येणार आहे. 

सध्या चित्रपट मालिका आणि जाहिरात क्षेत्रात रंगभुषा आणि वेषभुषा करणाऱ्या तज्ञांना मागणी असून या क्षेत्रात एक उत्तम व्यवसाय करण्याची संधी महिलांना / पुरुषांना उपलब्ध आहे. आपल्या कलेने एका व्यक्तीचे संपुर्ण रंगरूप पालटून टाकण्याचे कसब अंगी असूनही हे तज्ञ नेहमी पडद्या मागे रहातात अशाच गुणवंत कलाकारांना गौरवण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. अंजली जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पुण्यात पार पडलेल्या प्राथमिक फेरी ला भरगोस प्रतिसाद मिळाला. पुण्या व्यतिरिक्त भोर, चाकण, पिंपरी चिंचवड तसेच नगर इथून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धकांमधे चुरशीची चढाओढ पहायला मिळाली. कुणी वैजयंतीमाला, आशा पारेख, सायराबानो, मुमताज, हेलन तर कुणी रेखा, झीनत अमान, परवीन बाबी, श्रीदेवी, जयाप्रदा, माधुरी दिक्षित अशा ५० ते ९० दशकातील विविध अभिनेत्री साकारल्या होत्या. प्रत्येक स्पर्धकास तीन मिनटां चा कालावधी देण्यात आला होता. या मधे स्व परिचय आणि सादरीकरण असा समावेश होता. काही स्पर्धकांनी नृत्य, तर काही स्पर्धकांनी गायन करून आपल्यातल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमादरम्यान आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या सरिता सोनावणे यांनी सध्या महिलांना भेडसावत असलेल्या  स्तनांच्या कर्करोगाविषयी माहिती दिली हा रोग होऊ नये यासाठी काय उपाय योजना करावी यासाठी सखोल मार्गदर्शन केले. आस्था च्या माध्यमातून देशभर स्तनांच्या कर्करोगाविषयी जनजागृती करत असल्याचे त्यांनी संगितले तसेच ग्रामीण भागात शहरा पेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाल्याचेही नमूद केले. या वेळी अभिजीत जोशी मेमोरियल फाऊंडेशन चे उपाध्यक्ष अथर्व जोशी, सचिव नीतू कुमार तसेच सहाय्यक सचिव डॉ. निशा शहा उपस्थित होत्या. या स्पर्धेमध्ये स्वाधार या संस्थे तर्फे अनुराधा कळसे उपस्थित होत्या त्यांच्या संस्थेतील गरीब परिस्थिती असलेल्या परंतु अंगी कलागुण असलेल्या अनेक मुली स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. अनंतराव गांजवे, मदन गोगावले आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या विशेष सहकार्यामुळे अनेक बिकट आर्थिक परिस्थितीतील मुली या स्पर्धेमध्ये आपले कलागुण दाखवु शकल्या.

सहारा प्रॉडक्शन हाऊस चे डॉ. भवाळकर, सामाजिक कार्यकर्त्या आणि नेत्ररोग तज्ञ डॉ. सुनिता मोरे, माध्यम आणि विपणन क्षेत्रातील करुणा पाटील आणि दंतशल्य चिकित्सक आणि फिटनेस मॉडेल डॉ. हेमलता रोकडे यांनी प्राथमिक फेरी चे परीक्षण केले. कार्यक्रमास नगरसेवक राजेश येनपुरे, संगीत संयोजक विवेक परांजपे उपस्थित होते. सुप्रसिद्ध गायक मकरंद पाटणकर, मेनेक्वीन च्या ऐबी डिसुझा, एन पी बी चे  विशाल गूंड आणि आयप्लस मीडिया सोल्युशन्सचे जय प्रकाश पारखे आणि वैशाली चिपलकट्टी यांनी कार्यक्रमास विशेष सहकार्य केले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...