पूरप्रवण व दरडप्रवण गावामध्ये यंत्रणा सतर्क ठेवावी-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Date:

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा
पुणे,दि.23: पूरप्रवण व दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे, तालुका व गावपातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी मुख्यालयी राहून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी प्रशासनाला याबाबत माहिती देतानाच बाधित गावातील नागरिकांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील पूरस्थिती, पूरप्रवण गावे, दरडप्रवण गावे, व झालेल्या नुकसानीबाबत तालुकास्तरीय यंत्रणेसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तालुकानिहाय पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पूरप्रवण व दरडप्रवण गावांमध्ये यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपत्तीच्या कालावधीत काम करताना यंत्रणेमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेसोबतच व गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक तसेच यंत्रणेतील सर्वांनी मुख्यालयी थांबणे गरजेचे असून गावातील परिस्थितीबाबत सातत्याने प्रशासनाला माहिती दयावी. नियंत्रण कक्ष दक्षतेने कार्यान्वित करा तसेच पाऊस कमी झाल्यावर नुकसानीचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत. शासकीय मालमत्तेच्या प्राथमिक नुकसानीचे अहवाल सबंधित यंत्रणेने सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. पूरबाधित नागरिकांचे स्थलांतरण करून स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. तसेच पूरस्थितीमुळे तसेच दरड कोसळल्यामुळे महामार्ग बंद राहणार नाहीत याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने दक्षता घ्यावी तसेच शहरालगतच्या प्रकल्पातील पाणीसाठा व विसर्ग याबाबत सातत्याने नियंत्रण व समन्वय ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.
आपत्तीच्या कालावधीत काम करताना यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा असल्याचे सांगून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, पुणे जिल्हयातील पूरस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहावे लागेल. पूरप्रवण व दरडप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच पर्यटनस्थळी तसेच धबधब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, पुणे जिल्हयातील सर्व महामार्ग सुरळित सुरू राहतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही गावपातळीवर आपत्तीच्या कालावधीत काम करताना काय काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सर्व उपविभागीय प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस यंत्रणेतील अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी सबंधित तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिला आजपर्यंतचा एकमेव उमेदवारी अर्ज देखील आप चा दाखल

ढोल ताशांच्या गजरात प्रभाग क्रमांक ३४ मध्ये आम आदमी...

स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट...