पुणे – 34 व्या पुणे फेस्टिवलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या “गाये लता” या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली. पुण्यातील २० नामवंत गायिकानी स्व. लता दिदिंची अजरामर हिंदी चित्रपट गीते सादर केली. त्या बरोबर काही प्रसिद्ध बंगाली व राजस्थानी गीतेहि यात समाविष्ट होती.
संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या व दीदींनी गायलेल्या काही रचनाहि या सर्व गायिकानी सादर केल्या. त्या बरोबर साधना नृत्यालयाच्या नृत्यांगननी नृत्ये सादर केली. विशेष आकर्षण म्हणजे ‘आकृती’ गृपच्या चित्रकार महिला उर्मिला दुरगुडे, अनिता देशपांडे, वैश्णवी दामकोंडेवार यांनी लतादिदिंची विविध माध्यमातून चित्रे काढली. अहमदनगरचे सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार प्रमोद कांबळे यांनी त्यांच्या चित्रांतून दिदिंना श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शामकांत बा. देवरे* सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि उपसंचालक राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. याची संकल्पना व निवेदन अनुराधा भारती यांनी केले. संगीत, नृत्य व चित्रकला अशा तिन्ही माध्यमातून गानस्वरस्वती यांना स्वर सुमनांजली अर्पण करण्यात आली. व्होईस ऑफ पुणे फेस्टिवलच्या गतविजेत्या गायकांनी यात सहभाग घेतला होता. कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.