पंतप्रधानांच्या हस्ते प्रतिकात्मक भगवान श्रीरामाचा राज्याभिषेक

Date:

दीपावलीच्या पूर्वसंध्येला 23 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान अयोध्येला भेट देणार

पंतप्रधान सरयू नदीवरच्या नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होणार तसेच थ्री-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो ला उपस्थित राहणार

पंतप्रधानांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याचा होणार शुभारंभ

आज केदारनाथ बद्रीनाथ ला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीपावलीच्या पूर्वसंध्येला 23 ऑक्टोबर रोजी  अयोध्येला भेट देणार आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमाराला पंतप्रधान, भगवान श्री रामलल्ला विराजमान यांचे दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर ते श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. सायंकाळी पावणेसहा वाजता ते  भगवान श्रीरामाचा प्रतिकात्मक राज्याभिषेक करतील. संध्याकाळी साडेसहाच्या सुमाराला पंतप्रधान, सरयू नदीच्या किनारी नवीन घाटावर आयोजित आरतीमध्ये सहभागी होतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याचा शुभारंभ होईल.

दीपोत्सवाचे यंदाचे सहावे वर्ष आहे. पंतप्रधान पहिल्यांदाच या उत्सवात व्यक्तिश: सहभागी होणार आहेत. या उत्सवात 15 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. दीपोत्सवादरम्यान विविध राज्यांतील विविध नृत्यप्रकारांबरोबरच पाच अॅनिमेटेड चित्ररथ आणि रामलीलेवर आधारित अकरा चित्ररथही प्रदर्शित केले जाणार आहेत. सरयू नदीच्या किनारी राम की पायडी येथे आयोजित भव्य म्युझिकल लेझर शो बरोबरच थ्री-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो ला सुद्धा पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...