‘मानगढ धाम की गौरव गाथा’या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी

Date:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मानगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात आदिवासी वीरांच्या बलिदानाला  आणि हुतात्म्यांना त्यांनी यावेळी आदरांजली वाहिली.  कार्यक्रमस्थळी आल्यानंतर पंतप्रधानांनी धुनी दर्शन घेतले आणि गोविंद गुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आपल्या आदिवासी शूरवीरांच्या तपस्या, त्याग, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या मानगडच्या पवित्र भूमीत येणे नेहमीच प्रेरणादायी असते. “मानगढ हा राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील लोकांचा सामायिक वारसा आहे”, असे पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. गोविंद गुरु यांची 30 ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी होती, त्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.

गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने, गुजरातचा भाग असलेल्या मानगड प्रदेशाची सेवा करण्याची संधी मिळाली होती असे पंतप्रधान म्हणाले. गोविंद गुरू आयुष्याच्या शेवटच्या काळात काही वर्षे येथे होते. त्यांची ऊर्जा आणि ज्ञान आजही या भूमीच्या मातीत जाणवते असे पंतप्रधान म्हणाले.  इथला प्रदेश आधी ओसाड होता, मात्र वनमहोत्सवाच्या व्यासपीठावरून सर्वांना आवाहन केल्यावर हा संपूर्ण परिसर हिरवाईने पालटून गेल्याचं त्यांनी सांगितले.  या मोहिमेसाठी निस्वार्थपणे काम केल्याबद्दल पंतप्रधानांनी आदिवासी समुदायाचे आभार मानले.

विकासामुळे केवळ स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाली नाही तर गोविंद गुरूंच्या शिकवणीचा प्रसार देखील झाला असे पंतप्रधान म्हणाले. “गोविंद गुरूंसारखे महान स्वातंत्र्यसैनिक हे भारताच्या परंपरा आणि आदर्शांचे प्रतिनिधी होते”, “गोविंद गुरूंनी त्यांचे कुटुंब गमावले, परंतु त्यांचे मन कधीही खचले नाही. प्रत्येक आदिवासी व्यक्तीला त्यांनी कुटुंबच मानले.”  गोविंद गुरू यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला, त्याचवेळी एक समाजसुधारक, अध्यात्मिक नेते, संत आणि नेते असल्याने त्यांनी त्यांच्याच समाजातील कुप्रथांविरुद्धही मोहीम चालवली होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यांचे बौद्धिक आणि तात्विक पैलू त्यांच्या धैर्य आणि सामाजिक कार्याप्रमाणेच प्रभावी होते, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी, मानगढ येथील 17 नोव्हेंबर 1913 च्या हत्याकांडाचे स्मरण करून हे भारतातील ब्रिटीश राजवटीच्या अत्यंत क्रूरतेचे उदाहरण असल्याचे सांगितले. “एकीकडे  स्वातंत्र्य मागत असलेले निष्पाप आदिवासी होते, तर दुसरीकडे ब्रिटीश वसाहतवादी राज्यकर्त्यांनी मानगडच्या डोंगराला वेढा घातल्यानंतर, एक हजार पाचशेहून अधिक निष्पाप मुले, पुरुष, महिला, वृद्ध यांची दिवसाढवळ्या कत्तल केली.”  दुर्दैवी परिस्थितीमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या अशा महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक घटनेला इतिहासाच्या पुस्तकात स्थान मिळू शकले नाही, असे मत पंतप्रधानांनी व्यक्‍त केले.  या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारत, ही पोकळी भरून काढत आहे आणि दशकांपूर्वी झालेल्या चुका सुधारत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

“भारताचा भूतकाळ, इतिहास, वर्तमान आणि भारताचे भविष्य आदिवासी समाजाशिवाय कधीही पूर्ण होणार नाही असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या गाथेचे प्रत्येक पान आदिवासींच्या शौर्याने भरलेले आहे. तिलका मांझी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या 1780 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील संथाल संग्राम या गौरवशाली संघर्षांचे पंतप्रधानांनी स्मरण केले. त्यांनी 1830-32 चाही उल्लेख केला. त्यावेळी देशाने बुधू भगत यांच्या नेतृत्वाखाली लरका आंदोलन पाहिले. 1855 मध्ये सिद्धू-कान्हू क्रांतीने देशाला ऊर्जा दिली.  भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या उर्जेने आणि देशभक्तीने सर्वांना प्रेरित केले.  “शतकांपूर्वी गुलामगिरीच्या सुरुवातीपासून, ते 20 व्या शतकापर्यंत, आदिवासी समाजावे  स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली नाही असा कोणताही काळ  तुम्हाला सापडणार नाही,” असे पंतप्रधान म्हणाले.  त्यांनी आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू यांचा उल्लेख केला. त्याआधीही राजस्थानात आदिवासी समाज महाराणा प्रताप यांच्या पाठीशी उभा राहिला.  “आम्ही आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या बलिदानाचे ऋणी आहोत. या समाजाने निसर्ग, पर्यावरण, संस्कृती आणि परंपरांमध्ये भारताचे चारित्र्य जपले आहे.  त्यांची सेवा करून राष्ट्राने त्यांचे आभार मानण्याची आज वेळ आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती दिनी 15 नोव्हेंबर रोजी देश आदिवासी  गौरव दिवस साजरा करणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “आदिवासी गौरव दिवस म्हणजे भारतीय स्वतंत्रलढ्यात आदिवासी समुदायाने दिलेल्या  योगदानाबद्दल जनतेला प्रबोधन करण्याचा एक प्रयत्न आहे” असे ते म्हणाले. आदिवासी समाजाचा इतिहास, समाजातील प्रत्येकाला ज्ञात व्हावा यादृष्टीने देशभरात आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित अशी वस्तुसंग्रहालये उभारली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. हा अनमोल वारसा, तरुण पिढीच्या विचारधारेचा एक भाग बनून त्यांना सदैव प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशकार्यात आदिवासी समाजाची भूमिका विस्तारावी यादृष्टीने एका समर्पण भावनेने कार्य करण्याची गरज आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राजस्थानपासून ते गुजरातपर्यंत आणि ईशान्य भारतापासून ओरिसापर्यंत विखुरलेल्या वैविध्यपूर्ण आदिवासी समाजाच्या हितासाठी देश स्पष्ट धोरणांसह काम करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वसुधैव कुटुंबकम योजनेअंतर्गत देशातील आदिवासी समाजाला पाणी आणि वीज जोडणी , शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असे ते म्हणाले. आज देशातील वनक्षेत्र वाढत असून साधनसंपत्तीचे देखील जतन होत आहे,  त्याचवेळी आदिवासी बहुल भाग डिजिटल इंडियाशी जोडला जात आहे, असे ते म्हणाले. याशिवाय आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना पारंपरिक कौशल्यासोबतच आधुनिक शिक्षणाची संधी देणाऱ्या एकलव्य निवासी शाळांचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला. गोविंद गुरु जींच्या नावे असलेल्या विद्यापीठाच्या भव्य प्रशासकीय परिसराचे उद्घाटन करण्यासाठी ते जांबुघोडा येथे जाणार असल्याची माहितीही  पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी काल संध्याकाळीच  अहमदाबाद-उदयपूर ब्रॉडगेज मार्गावरील ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती दिली.  राजस्थानच्या जनतेसाठी या  300 किमी लांबीच्या मार्गाचे महत्त्व अधिक आहे कारण हा मार्ग  गुजरातमधील अनेक आदिवासी भागांना राजस्थानच्या आदिवासी भागांशी जोडेल आणि या प्रदेशांमधील औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना देईल, असे पंतप्रधान म्हणाले.

मानगड धामच्या सर्वांगीण विकासाबाबत झालेल्या चर्चेविषयी पंतप्रधानांनी माहिती दिली आणि मानगड धामचा  भव्य विस्तार व्हावा अशी इच्छा  त्यांनी व्यक्त केली. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या चार राज्यांनी एकत्रितपणे विस्तृत चर्चा करून गोविंद गुरु जींच्या वारसा स्थळाच्या विस्तारासाठी दिशादर्शक आराखडा तयार करावा जेणेकरून हे स्थान जगाच्या नकाशावर विराजमान होईल, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “ मानगड धामचा विकास झाल्यावर हा  परिसर नवीन पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल अशी मला खात्री आहे”, असे सांगून पंतप्रधानांनी समारोप केला.

गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री  अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल,  केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री  फग्गनसिंग कुलस्ते, खासदार, आमदार आदी यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वंतंत्र्य लढ्यातील आदिवासी समाजातील अनामवीरांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये १५ नोव्हेंबर (आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती) हा दिवस आदिवासी  गौरव दिवस’, म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यायोगे आदिवासी बांधवांनी   समाजासाठी दिलेले  योगदान  आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या बलिदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालये उभारणे इ. कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, पंतप्रधान,  स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात आदिवासी वीर आणि शहीदांच्या बलिदानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजस्थानच्या बांसवाडा येथील मानगढ हिल येथे ‘मानगढ धाम की गौरव गाथा’ या सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी भिल्ल स्वातंत्र्यसैनिक श्री गोविंद गुरु यांना आदरांजली वाहिली आणि भिल्ल आदिवासी आणि प्रदेशातील इतर आदिवासी लोकांच्या मेळाव्याला संबोधित केले.

राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश मधील आदिवासी समाज आणि भिल्ल समुदायाकरता मानगढ धाम ला विशेष महत्व आहे. स्वातंत्र्य संग्रामात जिथे भिल्ल आणि इतर जमाती इंग्रजांशी प्रदीर्घ संघर्षात गुंतल्या होत्या, त्यावेळी 17 नोव्हेंबर 1913 रोजी श्री गोविंद गुरूंच्या नेतृत्वाखाली 1.5 लाखाहून अधिक भिल्लांनी मानगड टेकडीवर मोर्चा काढला. ब्रिटीशांनी या मेळाव्यावर गोळीबार केला, ज्यामुळे मानगढ हत्याकांड घडले जिथे अंदाजे 1500 आदिवासी शहीद झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घाबरू नका,जुलै महिन्यात पुण्यात कोसळतील जलधारा.. जरा धीर धरा

एल निनो (El Niño) च्या संभाव्य परिणामाच्या पार्श्वभूमीवर महापालिका...

घोष पथकाच्या वादनातून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना

पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि...

पाणी साठवा, पण झाकून ठेवा; डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पुणे, दि. १८ : उन्हाळ्यात आणि ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’...

जगभरातील सैन्य दलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माउंटेड आर्टिलरी गन प्रणाली उपलब्ध करण्याचा करार

पॅरिस, फ्रान्स, १८ जून २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) लष्करी वाहनाधारित संरक्षण प्रणाली विकसित करणारी आघाडीची कंपनी एएम जनरल हिच्यासोबत युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात आज धोरणात्मक भागीदारी करार केला. बदलत्या युद्धपरिस्थितीत जगभरातील आधुनिक सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यात ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे सैन्य दलांना आकाराने कॉम्पॅक्ट, हलक्या वजनाचा, टिकाऊ, कठीण परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करणारा तसेच सर्व हवामानात आणि सर्व प्रकारच्या भूभागांवर सहज वापरता येणारा अत्याधुनिक ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सैन्य दलांना विशेष स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो. या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने ही भागीदारी मित्रदेशांमधील व्यापक वितरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक, गतिमान आणि युद्धपरिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या १५५ मिमी तोफखान्याची क्षमता विकसित करू इच्छिणाऱ्या भागीदार देशांसाठी हे व्यासपीठ विस्तारक्षम आणि निर्यातीसाठी योग्य उपाय म्हणून सादर केले जाणार आहे. या धोरणात्मक भागीदारीचा लाभ घेत ‘एएम जनरल’ने अमेरिकी लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ (एमटीसी) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकी सरकारला सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये केएसएसएलच्या माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मच्या युद्धपरिस्थितीत उपयुक्त ठरलेल्या आणि सिद्ध झालेल्या रचनेवर आधारित १५५ मिमी एमटीसी प्रणाली विकसित करून पुरविण्याचा समावेश आहे. या प्रस्तावाची निवड झाल्यास, या प्रणालीचे वितरण २०२७मध्ये करण्याचे नियोजन आहे. विशेष विकसित करण्यात आलेल्या पॉवरपॅक आणि सस्पेन्शन प्रणालीसह कमी वजनाच्या या वाहनामुळे एमएआरजी प्रणाली लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच रणांगणावरील जलद हालचालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रणालीमध्ये ५२ कॅलिबर १५५ मिमी तोफ, पेटंटप्राप्त सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी (एसआरटी) आधारित रीकॉइल नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात कार्य करणारी प्रगत फायर कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष मारा करणे शक्य होते. ही प्रणाली प्रमाणित उच्च-स्फोटक प्रक्षेपास्त्र ४० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत डागू शकते. तसेच या वाहनामध्ये २० हून अधिक प्रक्षेपास्त्रे आणि प्रोपेलंट चार्जेस साठवता येतात. पारंपरिक तोफखाना प्रणालींच्या तुलनेत ‘एमएआरजी’मधील एसआरटी प्रणाली ही रीकॉइलमधून निर्माण होणारा अधिकचा जोर शोषून घेते. त्यामुळे वाहन आणि टॉवरचे वजन कमी ठेवणे शक्य होते. तसेच संपूर्ण शस्त्र प्रणालीवर तिच्या वापराच्या कालावधीत कमी ताण येतो. ‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, "आमच्या प्रगत तोफखान्याच्या क्षमतांवर एएम जनरलने विश्वास दाखवला आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक आणि युद्धपरिस्थितीत सिद्ध झालेली उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून ही भागीदारी साकार झाली आहे." ‘एएम जनरल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न म्हणाले, "केएसएसएल’सोबतची ही भागीदारी आमच्या मित्रदेशांना आणि रणांगणावरील सैनिकांना सहाय्य करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि सिद्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’चा समावेश करून आम्ही खऱ्या अर्थाने नवी क्षमता उपलब्ध करून देत आहोत. रणांगणावरील बदलत्या परिस्थितीत यामुळे लष्करी दलांना महत्त्वाचा फायदा मिळू शकतो." केएसएसएल भारतात विकसित करण्यात आलेल्या आणि जागतिक दर्जाच्या निकषांशी सुसंगत संरक्षण प्रणाली तयार करते. भारतासह जगभरातील देशांना प्रगत संरक्षण क्षमता उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.