पुणे-ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने गठीत केलेल्या बांठिया समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्विकारला. यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणूका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम केले त्यामुळेच हे आरक्षण मिळाल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी दिली. याबद्दल त्यांनी सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ , धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार यांचे मनापासून आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी दिलेला मानवतेचा, सामाजिक न्यायाचा विचार महाराष्ट्रात सदैव जिवंत राहील, हा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून पुन्हा एकदा दृढ झाला आहे.
राज्यातील ओबीसी बांधवांच्या एकजुटीतून तसंच संपूर्ण महाराष्ट्रानं ओबीसी आरक्षणाला दिलेल्या एकमुखी पाठिंब्याच्या बळावर हे यश मिळालं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं बांठिया आयोगाच्या शिफारशी मान्य करुन त्यानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्याचा दिलेला आदेश हा राज्यातील ओबीसी बांधवांच्या हक्कांचा आणि महाविकास आघाडी सरकारनं ओबीसींच्या हक्कांसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली.
खा. शरद पवार यांनी त्याकाळात राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आणि राज्यात ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाला. ते आरक्षण अबाधित राहिलं, याचा मनापासून आनंद आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्याचं काम सुरुवातीपासून आम्ही केलं व व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची यापुढे देखील हीच भूमिका राहील” , असे देखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख ओबीसी सेल अघ्यक्ष दिपक जगताप, राजेंद्र अलमखाने , वनराज आंदेकर,रवि चौधरी , पुजा काटकर , राजश्री शिंदे ,राजश्री भगत ,गणेश ससाणे , अदिनाथ धिवरे , विलास साळुंखे ,ओंकार पेठकर,धमेंद्र राऊत , गणेश कांबळे, तुषार गादेकर व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.

