यापुढे मुख्यसभेत सावधानतेचा इशारा दिल्याशिवाय राष्ट्रगीत सुरु होणार नाही – आबा बागुल

Date:

पुणे- महापालिकेची मुख्य सभा तहकूब करताना अचानक कोणाला न समजता राष्ट्रगीत लावून सभा तहकुबीच्या प्रकाराने राष्ट्रगीताचे अवमान होण्याचे प्रकार दिसून आल्याने या पुढे सावधान ..राष्ट्रगीत सुरु होत आहे असा जाहीर इशारा देऊनच राष्ट्रगीत सुरु करावे असा कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी दिलेला ठराव पक्षनेत्यांच्या सभेत मंजूर करण्यात आला .विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनीही अशा प्रकारांना आक्षेप घेतले होते.

पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल या प्रकरणी म्हणाले कि,’भारतीय संविधानात राष्ट्रगीताचा सन्मान राखणे हे सर्व भारतीयांचे मूलभूत कर्त्यव्य असून पुणे महानगरपालिकेत राष्ट्रगीताचा मान राखला गेला पाहिजे.अशी मागणी ठरावद्वारे आबा बागुल यांनी केली. पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष कोणीही असो प्रश्नोत्तरे सुरु झाली की,  महापौर सभागृहात गोंधळ झाल्यावर, असेल तिथे राष्ट्रगीत सुरु करून सभा तहकूब करण्याची परंपरा काल खंडित करण्यात आली. पुणे महानगरपालिकेत मुख्यसभेत तहकुबीनंतर गोंधळ झाल्यास अनेकदा राष्ट्रगीत सुरु करून सभेचे कामकाज गुंडाळण्याची अनेक उदाहरणे अनेक वर्षांपासून घडली आहेत. यातून राष्ट्रगीताचा अपमान होतो. हे लक्षात घेऊन गोंधळ चालू असताना जर सभा तहकूब करायची असेल तरी ‘ राष्ट्रगीत सुरु होत आहे.असा  सावधानतेचा इशारा देवूनच राष्ट्रगीत सुरु केले जावे’. त्यामुळे राष्ट्रगीत सुरु होणार असल्याची जाणीव होऊन गोंधळ थांबेल. सर्वजण आपआपल्या जागी नीट उभे राहतील व त्यामुळे राष्ट्रगीताचा सन्मान राखला जाईल. यासाठीच यापुढे मुख्यसभेत तहकुबी नंतर गोंधळ झाला तरी पूर्व सूचना देऊनच राष्ट्रगीत सुरु करावे असा ठराव  दिला असून याचा धोरणात्मक निर्णय काल पक्षनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर झाला असल्याचे बागुल यांनी सांगितले. 

आबा बागुल म्हणाले की , पुणे महानगरपालीकेची दरमहा मा.मुख्य सभा बोलवण्यात येते. मुख्य सभा तहकूब झाल्यानंतर राष्ट्रगीत लावले जाते. वेळोवेळी मुख्य सभेमध्ये सभा तहकूबी मांडली असता ती तहकूबी स्वकारली जाते अगर टाळली जाते, यापैकी काही वेळा मुख्य सभेत तहकूबी मांडल्यानंतर गोंधळ झाल्यास तसेच काही वेळा अन्य कारणाने गोंधळ झाल्यास (उदा. आंदोलने) त्यामध्येच राष्ट्रगीत चालू केले जाते असे सध्याच्या काळात अनेकवेळा घडल्याचे निदर्शनास येत आहे.
तसेच राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांमध्ये देखील अशा घटना घडत आहेत. राष्ट्रगीत चालू होताना सभागृहाच्या दारात, बाहेर, पोर्चमध्ये कोणीही कोणत्याही दिशेला कसेही उभे असते असे चित्र वारंवार निदर्शनास येत आहे.
राष्ट्रगीताच्या वेळी सर्वांनी आपापल्या ठरलेल्या योग्य जागेवर सावधान मध्ये उभे राहणे बंधनकारक असल्याने राष्ट्रगीत चालू होत आहे, ही बाब राष्ट्रगीत चालू होणेपूर्वी कळणे अपेक्षित आहे. यामुळे सर्वांना राष्ट्रगीत चालू आहे हे कळेल, सबब राष्ट्रगीताचा सन्मान देखील राखला जाईल. गोंधळाच्या परिस्थितीत नकळत चुकीच्या पध्दतीने राष्ट्रगीत चालू केल्याने राष्ट्रगीताचा अपमान होत असल्याने याबाबत गांभीर्याने दक्षता घेऊन राष्ट्रगीत चालू करताना सर्वांना आधीच सूचित करणेस मान्यता देऊन याबाबत नगरसचिव  यांना सूचना देऊन कार्यवाही करण्यात यावी व पुणे महानगरपालिकेत गोंधळात राष्ट्रगीत सुरु करून सभा तहकूब करण्याची परंपरा खंडित करावी असे आबा बागुल शेवटी म्हणाले. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...