पुणे-
आधीच कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या संचारबंदीमुळे धनकवडी के. के. मार्केट परिसरातील मूर्तिकार बांधव अडचणीत आले आहेत. त्यात शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जण उत्सावाबरोबरच नुकतीच झालेली छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी झाल्याने येथील मूर्तिकारांवरील संकट आणखीन गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर गुलटेकडी एकता प्रतिष्ठान च्या वतीने मूर्ती घडविणार्या येथील दुर्लक्षित हाताला धान्य किटचे वाटप करत मदतीचा हात दिला आहे. गत वर्षांप्रमाणे यंदाचे वर्ष हे प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक व्यक्ती साठी अत्यंत कठीण असं ठरतं आहे. कोरोना नावाच्या विषाणूने जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण व्यवहार बंद असल्या ने पिढीजात व्यवसाय असणाऱ्या के के मार्केट मधील मूर्ति कारांवर उपासमारीची वेळ आली होती. परंतु अनलॉक सुरु झाल्यानंतर येथील मूर्तिकारांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला. मात्र कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या पुन्हा एकदा संकट घेऊन आली.दरम्यान स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महा राजांची जयंती सुद्धा अगदी साधेपणाने झाली. यामुळे येथील सर्वच व्यवसायिक संकटात सापडले आहेत. त्यांच्यावर रोजीरोटीचे संकट उभे टाकले आहे. कोरोना मुळे मूर्त्यांची विक्री होत नस ल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आर्ट ऑफ हेलपिंग फाऊंडेशनच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्य कर्ते गणेश शेरला यांना धान्य किट उपलब्ध करून देण्याची विनंती केली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने येथील मुर्तीकारांना धान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी कोमल जोरी, दिपंकर पाटील, जिजा इंगवले, महेश सांळुखे उपस्थित होते.