पुणे (प्रतिनिधी) : वसुबारसेच्या शुभ मुहर्तावर भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी) “गाय ते गोमाता” या अभियानाला सुरवात करण्यात आली. अभियानाद्वारे देशी गोवंशाची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. बीव्हीजीचे संचालक गणेश लिमये, शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत पाटील यांनी या अभियानाचे लोकार्पण केले. या वेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते हितेंद्र सोमाणी, बीव्हीजीचे रवी घाटे, अरुण बारगजे, वसुंधरा संस्थेचे डॉ. दीपक आहेर, डॉ. दिलीप हांडोरे, गो-पालक संजय बालवडकर उपस्थित होते.
देशी गो-वंशाची संख्या वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियाना अंतर्गत समाज प्रवाहातील गो-प्रेमींकडून १५०० रुपये घेतले जाणार आहेत. गो-प्रेमींनी दिलेल्या रकमेतून भाकड गाई-म्हशींना दुभत्या करण्यासाठी बीव्हीजीची पशुखाद्य पुरके गो-पालकांना घरपोहोच देण्यात येणार आहेत.
या वेळी लिमये म्हणाले, ” डॉ प्रशांत पाटील यांनी गेल्या दोन दशकाहून अधिक काळ औषधी वनस्पती आधारित पशुखाद्यांवर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधित पशुखाद्यपुरकास ५ भारतीय व ४ अमेरिकन पेटंट प्राप्त झाले आहेत. डॉ पाटील यांच्या संशोधित पशुखाद्य पुरकामुळे भाकड गाई-म्हशी विशेषतः देशी वंशाच्या गाई प्रजननक्षम होतात. सरासरी १०० भाकड गाई-म्हशी मधील ७० टक्के गाई म्हशी या पशुखाद्य पुराकातुन दुभत्या झाल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत ५००० पेक्षा अधिक गाई – म्हशीं वर बीव्हीजीच्या पशुखाद्य पुरकाचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाकड गाईं-म्हशींना पांजरपोळात जाण्यापासून नक्कीच रोखले जाईल.
पाटील म्हणाले, ना, नफा ना, तोटा या तत्वाचा अवलंब करून बीव्हीजीने देशी गोवंशाची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. देशात देशी गो- वंशाचा टक्का कमी झाला आहे. ही भारतीय गो पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे. बीव्हीजीने सुरु केलेल्या चळवळीत गो-प्रेमींनी सहभाग नोंदवून देशी गो- वंश वाढीसाठी हातभार लावणे ही काळाची गरज आहे.
बालेवाडी (पुणे) येथील गो-पालक संजय बालवडकर यांच्याकडील कांकरेज जातीच्या गाईला गेली ३.५ वर्षे या गाईला अनेक प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नव्हती. शेवटचा प्रयत्न म्हणून बालवडकर यांनी बीव्हीजीचे पशुखाद्यपूरक वापरले. परिणामी १५ दिवसातच गाय माजावर आली. त्यानंतर नैसर्गिक रेतनाच्या माध्यमातून गाय गाभण राहिली. नुकताच तीने सुंदर वासराला जन्म दिला आहे.
सनावळीच्या निमित्ताने अनेक भेटवस्तू देण्यात येतात. कालांतराने या भेटवस्तू शोभेच्या वस्तू होतात. परंतु देशी- गो पालकांना बीव्हीजीच्या पशुखाद्य पुरकाची भेट दिली तर देशी गो वंश वाढीला हातभार लागणार आहे. त्यामुळे बहुसंख्य गो-प्रेमींनी या अभियानात सहभाग नोंदवावा असे अवाहन बीव्हीजीचे सामाजिक प्रकल्प प्रमुख रवी घाटे यांनी केले.

