अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरेल-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Date:


अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आणि एकत्रित सभागृह इमारतीचे भूमिपूजन
पुणे दि.5: अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरणार आहे.
उच्च तंत्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना येथील शैक्षणिक संकुलनाचा निश्चितपणे फायदा होईल, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज व्यक्त केले.
अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील शासकीय महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि एकत्रित सभागृह इमारतीचा भुमीपुजन माजी केंद्रिय मंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले.यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,सहकारमंत्री बाळासाहेब पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,खासदार संजय राऊत, अतुल बेनके,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, कार्यकारी अभियंता बी.एन.बहिर,तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.अभय वाघ, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणेचे सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव, अवसरी खुर्दचे सरपंच जगदिश अभंग उपस्थित होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, अवसरी येथील शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरणार आहे. येथे शासकीय निधी उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे. शैक्षणिक सुविधा उभी राहिली आहे. याचा फायदा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग कॉलेज तसेच इतर कार्यक्रमांसाठीही होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, अवसरी येथे शैक्षणिक संकुल उभे राहिले याचा आपल्याला मनस्वी आनंद झाला. उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संकुलचा निश्चितपणे फायदा होईल. साखर कारखान्यामुळे या परिसरातील शेतीच्या अर्थकारणाला गती मिळाली असून 16 लाख लीटर दुधाचे उत्पादन येथे होते. शेतीसोबतच दुग्धव्यवसायातील प्रगतीही चांगली आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अवसरी येथे अभियांत्रिकी महाविद्यालयासारखेच महाविद्यालय रत्नागिरी येथे उभे करणार आहे. राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग देशातील एक आदर्श विभाग ठरेल, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम करून या विभागाला आणखी उंचीवर नेणार असल्याचे सांगून अवसरी येथे झालेल्या शैक्षणिक सोईसुविधेबाबत त्यांनी कौतुक केले.
खासदार संजय राऊत म्हणाले, अवसरी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन फुलले आहे.या संकुलातुन तयार होणारे हजारो विद्यार्थी राज्य व देशाच्या स्तरावर जातील व अवसरीचे नाव पुढे नेतील.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचा ६,००० कोटी रुपयांचा आयपीओ ११ मार्चला खुला होणार

·         राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एकूण ६०,०००.०० दशलक्ष रूपये किमतीचे...

ऊसतोड कामगारांसाठी सर्वसमावेशक कायदा आवश्यक : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. ५ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक...

विजेच्या कामातील एक चूक तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते – राजेंद्र पवार

महावितरण मध्ये 'लाईनमन दिवस' उत्साहात साजरा पुणे, दि. ५ मार्च,...

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...