मुंबई-माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. परमबीर यांनी पत्रात लिहिलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. एकूण 130 पानांची याचिका परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.
आयुक्तांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें पत्र लिहीले होते. यात असिस्टेंट पोलिस इंस्पेक्टर (API) सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संरक्षण असून, देशमुखांनी वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचे म्हटले होते.
परमबीर यांनी पत्रात हेदेखील म्हटले होते की, आपल्या चुकीच्या कामांना लपवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवले जात आहे. परमबीर यांनी आपल्या आरोपाशी संबंधित अनेक पुरावेदेखील याचिकेसोबत दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ही याचिका मंजुर केली आहे.
परमबीर यांनी पत्रात लिहीले- गृहमंत्र्यांनी टार्गेट दिले
मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात परमबीर म्हणतात की, ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना अनेकदा आपले शासकीय निवासस्थान ‘ज्ञानेश्वर’मध्ये बोलवले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाने जमा करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडेदेखील उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दर महीना 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.’ परमबीर सिंह यांनी पत्रात पुढे लिहीले की, ‘मी याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि NCP चीफ शरद पवारांनाही सांगितले आहे.

