आरोपीला अटक करण्यात आली आहे, आता राजकारण करु नका; साकीनाका घटनेवरुन संजय राऊतांनी सुनावले

Date:

मुंबई-मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये बलात्कार झालेल्या पीडीतेचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान विरोधकांकडून देखील या प्रकरणावर संताप व्यक्त केला जात आहे. यासोबतच राज्य सरकारवरही निशाणा साधला जात आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत विरोधकांना याबाबत राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.

या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मुंबईमध्ये महिलांना सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातल्या सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये मुंबईचे नाव येते. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. मात्र काल जेव्हा ही साकिनाकामध्ये ही घटना घडली त्यातील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. मात्र या सगळ्या विषयाचे राजकारण करु नये. गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचे राजकारण यामध्ये केले जाऊ नये. कारण या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात.’ असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालला पाहिजे. तसेच विरोधी पक्ष हे सरकारवर आरोप करत आहेत. त्यांनी भूमिका मांडायला हवी. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारला अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहेत आणि ती उचलल्याशिवाय राहणार नाही’ असेही राऊत म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...