केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली तिरुपती येथे दक्षिण विभागीय परिषदेची 29 वी बैठक संपन्न

Date:

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2021

दक्षिण भारतातील राज्यांची प्राचीन संस्कृती, परंपरा आणि भाषा या भारताची संस्कृती आणि प्राचीन वारसा समृद्ध करतात, दक्षिण भारतातील राज्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाशिवाय भारताच्या विकासाची कल्पना करता येणार नाही असे केंद्रीय  गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांनी सांगितले.श्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज तिरुपती येथे दक्षिण विभागीय परिषदेची  29 वी बैठक झाली, या बैठकीत बोलताना श्री. शाह म्हणाले की, मोदी सरकार भारतातील सर्व प्रादेशिक भाषांचा आदर करते आणि म्हणूनच दक्षिण विभागीय  परिषदेच्या आजच्या बैठकीत दक्षिण विभागीय परिषदेत समाविष्ट असलेल्या राज्यांच्या सर्व भाषांमध्ये भाषांतराची सुविधा देण्यात आली आहे. भविष्यात या परिषदेच्या प्रतिनिधींना त्यांच्या राज्याच्या भाषेत बोलताना पाहून आनंद होईल, अशी इच्छा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.कोविड-19 महामारीच्या काळात आपण आजपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या  111 कोटी मात्रा देण्यात  यशस्वी झालो आहोत असे सांगत  ही एक मोठी कामगिरी असून सहकारी संघराज्यवादाचे उदाहरण आहे, देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवादाचा  लाभ घेणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.जेव्हा महामारी सुरु झाली तेव्हा भारत या महामारीचा सामना करू शकणार नाही असे म्हटले जात होते मात्र  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आपल्या पायाभूत सुविधा तसेच लसींचे देशांतर्गत उत्पादन वेगाने वाढवले,आज, आपण महामारी बाबतच्या भीतीवर मात केली आहे आणि केंद्र सरकार लसीकरण कार्यक्रमांतर्गत सर्व राज्यांमध्ये लसीकरण व्याप्ती  वाढवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहील, असे श्री. शहा म्हणाले.श्री. शहा म्हणाले की, विभागीय परिषदा स्वाभाविकपणे सल्लागार संस्था आहेत आणि तरीही आम्ही अनेक समस्यांचे निराकरण करण्यात यशस्वी झालो आहोत, विभागीय परिषद उच्च स्तरीय  सदस्यांमधील परस्पर संवादासाठी संधी प्रदान करते. गृहमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या 7 वर्षात आम्ही विभागीय  परिषदेच्या 18 बैठका घेतल्या, या तुलनेत पूर्वी फारच कमी बैठका होत होत्या,आता विविध विभागीय  परिषदेच्या  बैठका नियमितपणे बोलावल्या जातात आणि हे सर्व राज्य सरकारे तसेच केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...