7 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर
भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चाललेल्या ज्ञान-आधारित गेम शो, कौन बनेगा करोडपतीचे नवीन सत्र लवकरच सुरू होत आहे. या शोचे 14वे सत्र केवळ हॉटसीटपर्यंत पोहोचणार्या स्पर्धकांसाठीच नाही, तर प्रेक्षकांसाठीही अधिक आकर्षक आणि समाधान देणारे असणार आहे. स्टुडिओ नेक्स्ट द्वारा निर्मित या शोचा शुभारंभ रविवारी 7 ऑगस्ट रोजी होणार असून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता हा शो प्रसारित करण्यात येईल.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाचे औचित्य साधून हा शो ‘आझादी के गर्व का महापर्व’ या धमाकेदार इव्हेंटच्या रूपात सुरू होणार आहे. श्री. अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन लाभलेल्या या विशेष भागात कारगिल युद्धातील वीर मेजर डी. पी. सिंह, सेना पदक विजेती कर्नल मिताली मधुमिता तसेच जगप्रसिद्ध भारतीय खेळाडू पद्मविभूषण एम सी मेरी कॉम आणि पद्मश्री सुनील छेत्री तसेच पद्मभूषण अभिनेता आमीर खान हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद द्विगुणित करत या शोमध्ये 15व्या प्रश्नावर एक पडाव दाखल करण्यात आला आहे. ‘धन अमृत’ नामक हा पडाव पार केल्यास स्पर्धकाला 75 लाख रु. बक्षीस रक्कम मिळण्याची हमी असेल! शिवाय, यापूर्वीच दाखल केलेल्या जॅकपॉट प्रश्नाची बक्षिसाची रक्कम देखील वाढवून आता 7.5 कोटी रु. करण्यात आली आहे. प्ले अलॉन्ग मार्फत या खेळात सहभागी होणार्या प्रेक्षकांना दर शुक्रवारी थेट हॉटसीटपर्यंत पोहोचण्याची संधी देखील या सत्रात मिळणार आहे……
श्री. एन. पी. सिंह, MD आणि CEO, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया
आमच्या सर्वात आयकॉनिक आणि प्रीमियम ब्रॅंड असलेल्या कौन बनेगा करोडपतीवर आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात करत आहोत. गेल्या 75 वर्षातील सिद्धी साजरी करण्याची, देशातील दिग्गजांचा सन्मान करण्याची ही आमची पद्धत आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीविषयीचे प्रेक्षकांचे ज्ञान वाढविण्याचा आमचा हा विनम्र प्रयास आहे.
श्री. दानिश खान, प्रमुख – चॅनल SET, डिजिटल बिझनेसिस अँड स्टुडिओनेक्स्ट
यावर्षीच्या KBC मध्ये 4 प्रमुख घटक आहेत- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा आनंदसोहळा, रोमांचक गेम, तत्काळ मोबदला आणि अधिक मोठी बक्षिसे. आम्हाला खात्री वाटते की, यामुळे KBC चा अनुभव स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी आणि प्ले अलॉन्ग खेळणार्यांसाठी अधिक आकर्षक आणि सुंदर असेल.
श्री. अमिताभ बच्चन
देशासाठी हे वर्ष विशेष लक्षणीय आहे, कारण आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारतीय सैन्य, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील देशातील दिग्गजांच्या सोबतीने या पर्वाची सुरुवात करताना मी गौरव अनुभवतो आहे. देशाच्या वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि नव्या युगाच्या भारताचे खरेखुरे प्रतिबिंब दाखवणार्या स्पर्धकांचे स्वागत करण्यास मी उत्सुक आहे.