शरद पवारांचा डोक्यावर ‘वरदहस्त’ म्हणूनच ते मुख्यमंत्री: खासदार कोल्हे

Date:

एक दिवस अगोदरच उद्घाटन करून श्रेय पळवू पाहणाऱ्या माजी खासदारांना इशारा

पुणे- खेड बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन विद्यमान खासदार यांचे ठरले पण त्यापूर्वीच एक दिवस अगोदर माजी खासदाराने ते उद्घाटन करून श्रेयाची पळवापळवी सुरु केल्याने आज प्रत्यक्ष नियोजित अधिकृत उद्घाटन समारंभात बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाषणातून वचपा काढला , ते म्हणाले मुख्यमंत्र्यांविषयी आम्हाला आदर आहेच पण, शरद पवारसाहेबांचा वरदहस्त डोक्यावर म्हणून ते मुख्यमंत्री आहे याचा विचार श्रेय मिळविण्यासाठी धडपड करणाऱ्यांनी करावा. .राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा डोक्यावर हात आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार आहे, असा स्पष्ट इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या हस्ते ,खासदार डॉ कोल्हे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत आज पार पडले.मात्र तत्पूर्वीच काल शुक्रवारी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी रस्ता होण्यासाठी प्रयत्न केले असे सांगत माजी खासदार आढळराव यांनी शिवसेनेचे कार्यकर्त्यासह येऊन खेड व नारायणगाव रस्त्याचे उद्घाटन केले होते. यावरून खासदार डॉ. कोल्हे आज रस्ता उद्घाटनप्रसंगी टीका केली.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे,खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर,जुन्नरचे संजय काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, अनिल बाबा राक्षे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर,माजी सभापती रामदास ठाकुर,दिलीप मेदगे,तिन्हेवाडीचे सरपंच अरुण थिगळे,तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे, संध्याताई जाधव, नवनाथ होले, किरण पवार ,प्रविण कोरडे, उमेश गाडे,विलास मांजरे, उपस्थित होते

कोल्हे म्हणाले, खेड बाह्यवळण रस्त्याचे श्रेय मिळविण्यासाठी माजी खासदार धडपडत आहे . जुलै २० मध्ये या कामाची वर्क ऑर्डर झाली आहे. त्यानंतर दोन वेळा कामावर समक्ष भेट देऊन अनेक अडचणी दूर केल्या. त्यामुळेच काम लवकर पूर्ण झाले. १५ वर्ष खासदार असूनही त्यांना चाकणची वाहतूक कोंडी सोडवता आली नाही. बैलगाडा शर्यती, विमानतळ आणि रेल्वे या कामातच फक्त राजकारण केल्याचे कोल्हे म्हणाले.

आमदार दिलीप मोहिते म्हणाले, माझ्या काळात तयार झालेल्या इमारतींचे उदघाटन स्व .सुरेश गोरे व आढळरावांनी केेले. मी त्यांच्यासारखी नौटंकी केली नाही. घाटाचे उद्घाटन करून त्यांनी काय साधले हे कळत नाही. निष्क्रीय आढळरावांच्या या नौटंकीचा आम्ही जाहीर निषेध करतो. रस्त्यातील अडथळे जेसीबीने काढल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. त्यांचे पोलीस संरक्षण काढावे. आंबेगावात सहकार्य तर खेडला विरोध हे दुटप्पी धोरण योग्य नाही फक्त खेड तालुक्यातील विकास कामांना विरोध करतात. मतभेद निर्माण करुन भांडणे लावतात.त्यांच्या कालच्या उद्घाटन कृतीचा निषेध करतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहा महिन्यांत रेल्वे तिकिटांच्या दरात दुसऱ्यांदा वाढ

आजपासून तुमचा रेल्वे प्रवास महाग झाला आहे. गेल्या सहा...

शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात:मंत्री संजय शिरसाटांचे मोठे विधान

आज किंवा उद्या युतीची घोषणा होईल छत्रपती संभाजीनगर-महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

पीएमआरडीए मुख्यालयात ‘वीर बाल दिन’; साहिबजाद्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन

पुणे : धर्म, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेसाठी अल्पवयातच सर्वोच्च बलिदान...

महापालिकांसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक मैदानात

मुंबई दि. २५ डिसेंबर - राज्यातील २९ महानगरपालिका सार्वत्रिक...