येत्या ४ जानेवारीला येणार ‘थापाड्या’

Date:

तुम्ही कधी मारली कुणाला थाप? ती समोरच्याला पचली की तुम्ही तोंडावर आपटले? तुमचा एखादा मित्र आहे का थापाड्या? थाप मारताना धमाल मज्जा येते ना? मग सज्ज व्हा अशाच एका भन्नाट ‘थापाड्या’ला भेटायला. मानसी फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, मास्क ग्रुप प्रस्तुत धमाल विनोदी, फुल टू मनोरंजन करणारा, अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा मराठी चित्रपट येत्या ४ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला.

भाऊसाहेब भोईर, शरद म्हस्के यांची निर्मिती असलेल्या ‘थापाड्या’ मध्ये अभिनेता अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड, ब्रिंदा पारेख, मोहन जोशी, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, दीपक करंजीकर, सुनील गोडबोले, विनीत भोंडे, संतोष रासने, प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर वास्तूतज्ज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर विशेष भूमिकेत दिसणार आहेत.

सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या ‘थापाड्या’ या चित्रपटाच्या फर्स्ट लुकला चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अजित बाबुराव शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ हा एक रॉमकॉन शैलीतील चित्रपट असून यामध्ये सस्पेन्स आणि थ्रीलरचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे सोबतच ठसकेबाज लावणीची अदाकारी यामध्ये दिसणार आहे.

‘थापाड्या’ची कथा, संकल्पना भाऊसाहेब भोईर यांची, कथा नितीन चव्हाण यांची तर पटकथा, संवाद समीर काळभोर यांचे आहेत. गीतकार गुरु ठाकूर, अभय इनामदार, मंदार चोळकर आणि जयंत भिडे यांच्या गीतांना संगीतकार पंकज पडघन, चैतन्य आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गायक आदर्श शिंदे, बेला शेंडे, आनंदी जोशी, सायली पंकज यांचा स्वरसाज गाण्यांना चढला आहे. चित्रपटाचे डीओपी सुरेश देशमाने आहेत, तर नृत्यदिग्दर्शन  लॉजिनिअस, फुलवा खामकर, निकिता मोघे यांचे आणि कलादिग्दर्शन संदीप इनामके यांचे आहे. निर्मिती सहाय्य संतोष शिंदे, तर निर्मिती सूत्रधार डिंपल जैन आहेत. ‘थापाड्या’ नक्की कोण आहे? हे येत्या ४ जानेवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...

मुंबई/पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासांनंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 31 तासांनंतर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी...

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य...