४० प्रशस्त खोल्या, मल्टी क्युझिन कॅफे, रुफटॉप ग्लोबल क्युझिन रेस्टॉरंट व बँक्वेटिंग सुविधा
पुणे – ‘द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ने ‘द फर्न रेसिडेन्सी’ हे आपले नवे हॉटेल पुणे एमआयडीसीमध्ये उभारले आहे. हे मिड-स्केल बिझनेस हॉटेल असून त्यात ४० प्रशस्त खोल्या, मल्टी क्युझिन कॅफे, रुफटॉप ग्लोबल क्युझिन रेस्टॉरंट व अत्याधुनिक बँक्वेट हॉल आदी सुविधा सज्ज आहेत. या हॉटेलचे मालक व प्रवर्तक ‘म्हस्के लेझर प्रायव्हेट लिमिटेड’ असून ही कंपनी हॉटेल्स व रिअल इस्टेट विकास क्षेत्रात कार्यरत आहे.
‘द फर्न रेसिडेन्सी’ हे स्मार्ट बिझनेस हॉटेल असून ते पुण्याच्या औद्योगिक परिसरात व्यूहात्मक मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आहे. या हॉटेलमध्ये मध्यम व किफायती गटातील व्यावसायिक प्रवाशांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या सर्व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आहेत. हॉटेलमध्ये खास खोल्या असून ‘टेन कॅफे’ हे आधुनिक कॉफी शॉप, तर ‘अझू’ हे सिग्नेचर स्पेशॅलिटी रेस्टॉरंट आहे. वाय-फाय फ्री झोन आणि कॉन्फरन्स सुविधा यांसारख्या आजच्या व्यावसायिक प्रवाशांच्या गरजांची पूर्तता हे हॉटेल करते.
‘द फर्न रेसिडेन्सी’ हे हॉटेल पुणे शहराच्या उत्तरेला राष्ट्रीय महामार्ग क्र. २० वर (पुणे-नाशिक शहरांना जोडणाऱ्या) आहे. येथून विमानतळ २० किलोमीटरवर असून जवळचे चिंचवड रेल्वे स्थानक २.२ किलोमीटर अंतरावर आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स पोर्टफोलिओचा भाग असलेल्या ‘कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी’कडे आहे.
http://www.fernhotels.com
द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स – भारताची आघाडीची पर्यावरण संवेदनशील हॉटेल साखळी
‘द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ हा भारतातील वेगाने विस्तारणाऱ्या हॉटेल ब्रँड्सपैकी असून तो २१ हून अधिक ठिकाणी १५०० हून अधिक खोल्यांचे व्यवस्थापन करतो. जबाबदार आतिथ्य व शाश्वत पर्यटनात हा ब्रँड आघाडीवर आहे. याच दृष्टीकोनामुळे या ब्रँडला अतिथी, सरकार, स्पर्धक व समाज आदी सर्व घटकांकडून गौरव प्राप्त झाला आहे. ‘लीडिंग एन्व्हॉयर्नमेंटली सेन्सिटिव्ह हॉटेल्स’ या मूलतत्त्वासह आम्ही आलीशानता व निसर्गासमवेत सहअस्तित्व यांचा परिपूर्ण समन्वय साधण्यावर श्रद्धा ठेवतो. या ब्रँडला ४१ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
‘सीएचपीएल’विषयी – ‘कन्सेप्ट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ ही हॉटेल मॅनेजमेंट कंपनी असून ती हॉटेल्स, रिसॉर्ट्स व सर्व्हिस्ड अपार्टमेंट्स क्षेत्रात कार्यरत आहे. प्रामुख्याने भारतात व निवडक परदेशी शहरांत २८ हून अधिक ठिकाणी ही कंपनी द फर्न, द फर्न रेसिडेन्सी व बीकन या ब्रँड्सअंतर्गत सेवा पुरवते, ज्यात स्वतंत्र हॉटेल्सचा संग्रहही समाविष्ट आहे. आमचे २५ प्रकल्प सध्या विकासाच्या विविध टप्प्यांत प्रगतिपथावर आहेत.
‘लीडिंग एन्व्हॉयर्नमेंटली सेन्सिटिव्ह हॉटेल्स’ या बेसलाईनसह ‘द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या हॉटेल ब्रँड्सपैकी असून सध्या १८०० हून अधिक खोल्यांचे व्यवस्थापन करतो. वर्ष २०१६ ते २०१८ या काळात आणखी ११५० हून अधिक खोल्यांची भर पडण्याची अपेक्षा आहे.
‘सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’
‘सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ हा निर्णय-प्रेरित व्यवस्थापन समूह असून त्यात हॉटेल्स व्यवसायातील २०० एकत्रित वर्षांचा अनुभव असलेले विशेषज्ञ कार्यरत आहेत. या कुशल संघात नामवंत जनरल मॅनेजर्स, माजी मुख्य कामकाज अधिकारी, तसेच आशियातील सर्वांत यशस्वी काही हॉटेल्स विकसक समाविष्ट आहेत. ‘सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ या स्पर्धात्मक उद्योगात हॉटेल्स क्षेत्रातील बारीक-सारीक तपशील व यशासाठीच्या सिद्ध तंत्रांचा वापर करतो.
‘सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’ आशिया, पश्चिम आशिया व आफ्रिका येथील आपल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रेसिडन्स व स्पा मध्ये आधुनिक संकल्पना साकारतो, तसेच सर्व सीमा ओलांडून दर्जाचा नवा मापदंड रुढ करणाऱ्या ठळक, इच्छित व अभिनव उत्पादनांचा संग्रह सादर करतो. ‘सीजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स’कडे तो कार्यरत असलेल्या बाजारपेठेशी सुसंगत असे अनेक फायदेशीर ब्रँड आहेत. त्यामध्ये द झिंक, द फर्न हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स, झिंक जर्नी, झिंक सिटी, द फर्न रेसिडेन्सी, बीकन व झिंक लिव्हिंग यांचा समावेश आहे.