मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

Date:

पुणे-मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजीत घवले यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत शंकर गोडा यतनाल यांचाही समावेश आहे. अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले आपल्या कुटुंबीयांसह लातूरला निघाले होते. साडू, बायको आणि चालक असे मिळून गावी चालले होते.

आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारच्या समोरील टायर फुटले. त्यानंतर भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये अभिजीत घवले आणि शंकर गोडा यतनाल यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत असलेले अपघातात वाहन चालक तसंच अभिजीत घवले यांच्या पत्नी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला केले आहे. या भीषण अपघातामुळे घवले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...