तब्बल पुढच्या ७ वर्षासाठी काढले ३२ कोटीचे टेंडर -अजब कारभाराचा गजब नमुना

Date:

पुणे- महापालिकेत युक्त्या ,प्रयुक्त्या, डाव ,प्रती डाव यांबाबत कशाची कमतरता नाही यासाठी इथे मातब्बर पैलवान आहेत .वेगवेगळ्या दिशेचे असतील किंवा मध्यवर्ती भागातील असतील पण सारेच मातब्बर . पुढच्या निवडणुकानंतर ज्याची सत्ता येईल ती येवो ,पण पुढची ५ वर्षे इथला ठेकेदार आपलाच राहिला पाहिजे ना…. आणि मेट्रोचा ,२४ बाय ७ चा अशा मोठ मोठ्या प्रोजेक्टवर गाडी थांबणार आहे काय ? म्हणूनच बहुधा कोणी तरी शक्कल लढविली आणि तब्बल ७ वर्षासाठी ड्रेनेज सफाई चे ३२ कोटी ६४ लाखाचे टेंडर काढले . अर्थात यासाठी सारे काही अगोदरच ऑल सेट पद्धतीने कारभार कसा होईल याची दक्षता घेण्यात आलीय . ..स्पर्धा वगैरे काही होऊ शकत नाही, एकच कतार .. एकच व्यक्ती

एकच व्यक्ती डोळ्यापुढे ठेऊन हे टेंडर मागविण्यात आलेय अशी तक्रार कॉंग्रेसकडून महापालिका आयुक्तांकडे केली आहे .या संदर्भात नगरसेवक अविनाश बागवे म्हणाले कि,’ ,’महापालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन साफ सफाई करण्यासाठी ,१२ के एल क्षमतेचे ४ सक्शन कम जेटींग रिसायकलर मशीन च्या सहाय्याने काम करण्यासाठी हे टेंडर आहे. ज्यामुळे नदी ,तलावातील जलपर्णी देखील काढली जाणार आहे. काही वर्षांपूर्वी महापालिकेने जे एन यु आर एम अंतर्गत याच मशीन घेतल्या आहेत ज्या अक्षरशः पडून आहेत किंवा गंज लागून आहेत . त्या चालविण्यासाठी पुण्यात कोणी सक्षम व्यक्ती नसल्याचा अजब गजब दावा केला जातोय . हि एक मशीन सुमारे ४ कोटी ला घेण्यात आली होती . आता ४ मशिनच्या सहाय्याने काम करण्याची निविदा मागविली आहे. म्हणजे १६ कोटीच्या मशीन संबधितांनी वापरायच्या आहे . त्यावर अंदाजे जास्तीत जास्त १२ लोकांचे मनुष्यबळ असू शकणार आहे. प्रत्येक मशीन शिफ्ट नुसार वापरून त्याचे चार्जेस अदा करण्यात येणार आहे , वर्षाचे ३१२ शिफ्ट धरून चार मशीनचे १२४८ शिफ्ट पकडून प्रती शिफ्ट ३६२०० रुपये प्रमाणे पहिल्या वर्षी ४ कोटी ५१ लाख ७७ हजार ६०० रुपये अदा करण्यात येतील ,तेवढेच दुसऱ्या वर्षी येतील.नंतर तिसऱ्या वर्षापासून मात्र शिफ्टच्या रकमेत वाढ करण्यात येईल . आणि सात वर्षात ३२ कोटी ६४ लाख ७६ हजार ८०० रुपये अदा करण्यात येतील किंवा काम वाढून जादा शिफ्ट झाल्या तर त्यानुसार म्हणजे सात वर्षापूर्वी देखील ३२ कोटी ६४ लाख ७६ हजार ८०० रुपये यापर्यंत काम करून घेण्यात येईल असे याबाबतच्या प्रस्तावात म्हटलेले आहे.अर्थात शिफ्ट आठ तासाची आहे .

महापालिकेने वर्षा वर्षासाठी फार तर दोन -तीन वर्षासाठी टेंडर काढणे समजू शकतो पण ७ वर्षासाठी, आणि टेंडर मधील अटीशर्ती ,निविदा मागविण्यासाठी केलेली जाहिरात या सर्वाचीच चौकशी व्हायला हवी अशी मागणी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...