Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापालिकेत 700 वाहनचालक भरतीचे टेंडर, विशिष्ट ठेकेदारासाठी आटापिटा ?

Date:

पुणे- कामगारांना एक तर कोणी वाली राहिलेला नाही अप्पासाहेब भोसले यांच्या नंतर महापालिकेतील कामगार चळवळ जवळ जवळ संपुष्टात आली . सर्व कामगार नेते कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना जोडले गेलेले दिसले . टेल्कोचा शनिवार वाड्यावरील सत्याग्रह पुण्यातील कामगार चळवळीतील शेवटचा मोठा सत्याग्रह ठरला . पण त्यांनतर कॉंग्रेसच्या तत्कालीन नेत्याने  तो करणाऱ्या कामगार नेत्याला  आपल्या दावणीला बांधून त्याची चळवळीची कारकीर्द संपुष्टात आणली तिथे महापालिकेची काय कथा … आणि आता त्यात थेट भरती न करता 6 महिन्यांच्या कालावधी साठी टेंडर ने ठेकेदाराकरवी भरती करायला सुरुवात झाली म्हणजे सर्वच बट्ट्याबोळ. महापालिकेच्या मोटार वाहन विभागाने हे टेंडर काढले आहे , स्वच्छता विभागाच्या तैनाती साठी . कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर ७०० वाहनचालक महापालिकेला हवे आहेत . महापालिकेकडे सुमारे १३०० गाड्या कचरा वाहतुकीसाठी आहेत . आणि केवळ ५०० चालक महापालिकेकडे कायम स्वरूपी नौकरीवर आहेत . रोज १२०० गाड्या कचरा वाहतुकीचे काम करतात . प्रत्येक गाडी अवघ्या २ खेपा करते . जर महापालिकेला १२०० गाड्यांवर रोज चालक हवेच आहेत तर महापालिकेने नेमके किती चालक कायमस्वरूपी भरले पाहिजेत असा साधा सवाल केला तर सुट्ट्या , रजा वगळता महापालिकेने १३०० च्या पुढे चालकांची कायमस्वरूपी भरती करायला हवी आणि ती थेट जाहिरात देऊन करणे क्रमप्राप्त आहे. कचरा उचलण्याचे काम हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे,तात्पुरत्या कालावधी साठीचे काम नाही कि ज्यासाठी तात्पुरत्या कालावधी साठी टेंडरने  भरती करावी . अगदी याच टेंडर पद्धतीमुळे ठेकेदार आणि महापालिका अधिकारी आणि ठराविक पदाधिकारी यांचे उखळ पांढरे होते आणि पिळवणूक सहन करणारे कमी पगारावरील ,बाहेर भ्रष्टाचाराला प्राधान्य देणारे चालक महापालिकेच्या पदरात पडतात . हि वस्तू स्थिती आहे . आणि अशा स्थितीत कोणी स्थानिक तरुणाई बहुधा काम करायला तयार होत नाही अन अमहाराष्ट्रीयन वर्ग येथे येऊन अशी कामे पत्करतो . आणि इथला बेरोजगार व्यवस्थित कायदेशीर मार्गाने रोजगाराच्या मागे धावतानाच दिसतो .आता ७०० वाहनचालक भरतीचे जे टेंडर काढले आहे त्याच्या अटी शर्ती मोठ्या जटील ,औरंगजेबाला लाजवतील अशा आणि विशिष्ठ ठेकेदारच डोळ्यासमोर ठेऊन निर्माण केल्याचा आरोप होताना दिसतो आहे. चालक जरूर अनुभवी असावा , चांगल्या वर्तणुकीचा असावा पण इथे मात्र ठेकेदाराबाबत असे निकष लावले आहेत कि , नवीन तरुणाई या अटी शर्तीत बसणारच नाही आणि जुन्या सरावलेल्या, संबध  प्राप्त झालेल्या ठेकेदारांनाच हे टेंडर मिळावे हे प्रामुख्याने पाहिले गेलेलं आहे. अक्षयकुमार च्या एका हिंदी चित्रपटात मनोज जोशींनी साकारलेली अधिकाऱ्याची  भूमिका आठवा आणि अक्षय कुमारने टीचकुले  अँड टीचकुले हा ठेकेदार साकारलेला आठवा .. अगदी असाच प्रकार इथे नव्याने उभे राहू पाहणाऱ्या तरुनाइबद्द्ल होताना दिसतो आहे.

महापालिकेला कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पद्धतीने वाहन चालक सेवक पुरविण्याचे हे टेंडर आहे तब्बल ३४ कोटी ४ लाख २१ हजार ८३० रुपयांचे . टेंडर फोरमची किंमत आहे,२९ हजार ६७९ रुपये जी नॉन रिफंडेबल आहे.या कामाची मुदत आहे २ वर्षे किंवा टेंडर रक्कम संपे पर्यंत .अ पाकीट आणि ब पाकीट अशा दोन्ही प्रवर्गात हे टेंडर मागविण्यात आले आहे. टेंडर च्या अ वर्गात दुसरी अट जी आहे त्यात, ठेकेदाराने २०१६ पासूनचा आयकर ,जीएसटी भरल्याचे प्रमाण पत्र सादर केले पाहजे .तिसऱ्या अटीत टेंडर दाराची वार्षिक उलाढाल १२ कोटी ७६ लाख ५८ हजार १८६ रुपये असल्याची अट घातली आहे.सातव्या अटीत बँकेची ३ कोटी रुपयांची बँक सोल्वान्सी प्रमाणपत्र जोडले पाहिजे . तर आठव्या अटीत टेंडर दराने मागील ५ वर्षात १० कोटी २१ लाख २६ हजार ५४९ रुपये किमतीचे एक तरी काम पूर्ण केल्याचे दाखविले पाहिजे .त्याबाबतचे कार्यादेश ,अनुभव दाखले सोबत जोडले पाहिजेत व सेवा घेतलेल्या कामगारांचा पीएफ ,इएस आय भरल्याचे सक्षम अधिकार्याचे दाखले जोडले पाहिजेत . अश स्वरूपाच्या अटीआहेत . ज्या विशिष्ट ठेकेदारालाच डोळ्यासमोर ठेऊन ,नवीन ठेकेदाराला संधी मिळणार नाही यापद्धतीने केल्याचे स्पष्ट दिसते आहे .महापालिकेने हे टेंडर काढले आहे,१३ जुलै ला आणि टेंडर ची अंतिम तारीख आहे ३० जुलै .. आता पहा महापालिकेने या टेंडर च्या आयटेम -डीस्क्रीप्शन , क्वांंटीटी युनिट आणि अमावुंट  फोर्म मध्ये काय म्हटले आहे प्रथम सहामाहीतील ५ महिन्या करिता ७०० सेवक (१५३ दिवस)१ जुलै २० ते ३१ /१२/२० (टेंडर काढले १३ जुलै ला, माणसे हवीत १ जुलै पासून, क्वांंटीटी आहे १ लाख  ७ हजार १०० म्हणजे महापालिकेला या १५३ दिवसात ७०० सेवकांकडून १ लाखावर कचरा गाड्याच्या खेपा करायच्या आहेत . एका सेवकाला ६४९ रुपये प्रती दिन असा दर देण्यात आला आहे .दुसऱ्या सहामाहीत १८१ दिवस खेपा १ लाख २६ हजार सेवकाचा प्रती दिन पगार १० रुपयाने वाढविला आहे तो आहे ६५९ रुपये. अशा पद्धतीने तो तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या सहामाहीत प्रत्येकी १० रुपये प्रतिदिन प्रमाणे वाढविला आहे .टाटा ,आयशर ,लेलँड .चे बीआरसी ,कॉम्पकटर ,टिपर ,,घंटा टिपर,,लाईट कॉम्पकटर ,३ चाकी टाटा एस ,बजाज सी जी मॅक्स,व पियाजो अॅपे,महिंद्र जियो अशा विविध ३ व ४ चाकी वाहनांचा यात समावेश असून प्रचलित विशेष भत्ता ,घरभाडे भाता ,ई एस आय ,इपीएफ ,बोनस ,रजा वेतन ,कामगार कल्याण निधी अशा सर्व बाबी यात ठेकेदाराने पहायच्या आहेत.  सर्वात महत्वाचे म्हणजे एच जी व्ही ट्रान्सपोर्ट संवर्गातील वाहनांसाठी रोज १२ तासाची ड्युटी म्हणजे  रोज ८ तासाची स्टेअरिंग ड्युटी आणि ४ तास स्प्रेड ओव्हर टाइम जो  मोटार ट्रान्सपोर्ट व्हेईकल अक्त   १९६१ नुसार असेल आणि एल एम व्ही संवर्गातील वाहनांसाठी ८ स्टेअरिंग ड्युटी व २ तास ओव्हर टाईम असा १० तासाचा असेल पण तो प्रतिदिन ८ तासाप्रमाणे मानून पेमेंट केले जाईल  टेंडर दारांच्या सेवकांचा वापर महापालिका मन मानेल तसा करवून घेईल ज्यास टेंडर दारास  तक्रार करता येणार नाही , कधी जास्त सेवक लागल्यास ते आहे त्याच दरात पुरवावे लागतील ,कमी सेवक लागल्यास त्याबाबत विचारणा करण्याचा अधिकार टेंडर दारास  नसेल .निव्वळ टेंडर मान्य झाले म्हणून लगेचच सेवक पुरविण्याचा प्रकार  गैर मानला जाईल . टेंडर मान्य झाल्यावर करारनामा झाल्यावर त्यावर सह्या झाल्यावर वर्क ऑर्डर मिळाल्यावर मोटार वाहन विभागाच्या सक्षम अधिकाऱ्या ने केलेल्या लेखी मागणीनुसार सेवक पुरवावेत , तोंडी मागणी नुसार पुरविल्यास त्याची जोखीम टेंडर दारावर राहील. सर्वात कमी दराचेच टेंडर स्वीकारा अगर कोणते टेंडर का स्वीकारले यास उत्तर देण्यास महापालिका आयुक्त बंधनकारक नाहीत . टेंडर दराने कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास त्याची कितीही रक्कम जप्त करण्याचा अधिकार आयुक्तांना राहील .लेबर लॉ पाळण्याची सर्वस्वी जबबदारी ठेकेदाराचीच राहील.वाहन चालक हा चौथी पास असावा ,त्याची ओळख आणि कागदपत्रे याची माहिती ठेकेदारानेच ठेवावी जड वाहन चालविण्याचा परवाना त्याला असणे आवश्यक आहे. त्याच्याकडून काही अपघात नुकसान झाल्यास भरपाई ठेकेदारानेच द्यायची आहे…….. आता सांगा असा ब्रिटिशांच्या राजवटीत हि  नसेल असा  तुघलकी  कारभार असेल तर कोणता नवीन तरुण आपले करिअर येथे करायला जाईल . आणि कोणते वाहन चालक अशा कामावर जातील .. तुम्हाला वाटतंय शहाणे सुरते मराठी स्थानिक तरुण इथे काम करतील , आणि केले तरी ते स्वीकारले जातील, आणि स्वीकारले गेले तरी ते इथे टिकतील … लोकशाही राबविणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली तरी हा तुघलकी कारभार इथे कोणाला दिसला नाही , दिसत नाही . याच कारभारातून मग होतो भ्रष्टाचार आणि मर्जीतल्या ठेकेदारांना सांभाळून कामगारांची पिळवणूक करीत त्या कामगारांनाही केले जाते लाच खाण्यासाठी हलाल असे म्हटले तर नवल ठरणार नाही . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुकडेबंदी कायदा रद्द अधिसूचना जारी … बावनकुळे

मुंबई- सरकारने याच अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तुक्देबंदी कायदा रद्द...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो...

आम आदमी पार्टी जिल्ह्यात सर्व स्थानिक निवडणुका लढवणार

पुणे-राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण,...