पुणे(प्रतिनिधी) – आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर क़ॉंग्रेस पक्षाची धुरा प्रियंका गांधी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी प्रियंका गांधी यांनी आपली टीम निवडण्यास सूरूवात केली आहे. या टीम मध्ये राष्ट्रीय प्रवक्ता म्हणुन पुण्यातील कॉंग्रेसचे नेते तेहसीन पूनावाला यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
कॉंग्रेस मध्ये राहुल आणि प्रियंका या दोघांच्याही विश्वसातील नेते म्हणुन तेहसीन पूनावाला हे कॉंग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळात ओळखले जातात. तसेच पूनावाला हे रॉबर्ट वड्रा यांचे मेव्हणे आहेत. पूनावाला मागील पाच वर्षाहून अधिक काळ कॉंग्रेस मध्ये सक्रिय असून विविध इंग्रजी आणि हिंदी वृत्त वाहिन्यावरील चर्चामध्ये ते पक्षाची भुमीका मांडत असतात. प्रियंका गांधी यांनी आपल्या विश्वातील कार्यकर्त्यांना उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळेच त्यांच्या निकटवर्तीय युवा कार्यकत्यांमध्ये समावेश असलेल्या आणि राष्ट्रीय प्रसार माध्यमांशी मैत्रीपुर्ण संबध असलेल्या पूनावाला यांच्याकडे उत्तर प्रदेशची विशेस जबाबदारी सोपविण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते. युपी विधानसभेच्या रणांगणात उतरविण्यासाठी निवडण्यात आलेल्याकार्यकर्त्यांची आणि त्यांच्या जबाबदारीची उद्या घोषणा करण्यात येणार आहे त्यामध्ये तेहसीन पूनावला यांना राष्ट्रीय प्रवक्ते म्हणुन नेमल्याची घोषणा होणार असल्याचे त्यांनी सांगीतले
तेहसीन पूनावालांची कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी वर्णी
Date:

