कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुप 1500 कोटी देणार, आतापर्यंतची सर्वात मोठी मदत-कोरोनाचे रुग्ण आणि डॉक्टरांसाठी ताज हॉटेलमधून मोफत जेवण दिले जात आहे

Date:

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. आतापर्यंत 933 प्रकरणे समोर आली आहेत तर 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावत आहेत. अशातच टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला 500 कोटीची मदत करण्याचे जाहीर केले आहे.सुरुवातील रतन टाटा यांनी 500 कोटी देण्यासंबंधी माहिती दिली होती. पण, थोड्यावेळानंतर टाटा ग्रुपकडून अजून 1 हजार कोटी देण्याचे जाहीर करण्यात आले.

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा म्हणाले की, कोरोनाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने लवकरात लवकर पुरवावीत. यापूर्वी वेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी देण्याची घोषणा केली होती. तर महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे म्हटले होते.

कोरोनावर मात करण्यासाठी देशातील सर्व रुग्णालयीतल डॉक्टर, नर्स आणि इतर मेडिकल कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. ते आपल्या जीवाची आणि कु्टुंबाची पर्वा न करत अहोरात्र झटत आहेत. संसर्गाचा धोक्या असल्यामुळे अनेकजण आपल्या घरी देखील जात नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना दोनवेळचे जेवणही व्यवस्थित मिळत नाही. अशावेळी टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलने मुंबईतील मेडिकल कर्मचारी, रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.

अनिल अग्रवाल आणि आनंद महिंद्रा यांनीही केली होती मदतीची घोषणा

यापूर्वी वेदांत ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनी एका महिन्याचा पगार देणार असल्याचे सांगितले होते. तर पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

रिलायन्सने कोरोनाग्रस्तांसाठी उभारले 100 बेडचे हॉस्पिटल

रिलायन्स ग्रुपने मुंबईत बीएमसीच्या मदतीने कोरोनासाठी स्पेशल 100 बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. बीएमसीच्या मदतीने फक्त दोन आठवड्यात हे हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलचे नाव देखील कोविड-19 ठेवले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...