पुणे-पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने एमपीसी न्यूजचे कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर यांना गौरविण्यात आले. शुक्रवारी (6 जानेवारी) पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी पिंपरी महानगरपालिकेच्या कै. भा. वि. कांबळे पत्रकार कक्षातील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व कै.भा. वि. कांबळे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून पिंपरी-चिंचवड शहरातील 5 पत्रकारांना”कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने ” त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले.
हृषीकेश तपसाळकर यांच्यासह सकाळचे मिलिंद वैद्य, नवनायक चे बाळासाहेब ढसाळ, आयबीएन लोकमत चे गोविंद वाकडे, आणि पवना समाचार चे अरुण उर्फ नाना कांबळे यांना देखील पत्रकारांना “कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने ” गौरविण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, संघाचे समन्वयक अनिल वडघुले, कार्याध्यक्ष गणेश हुंबे, उपाध्यक्ष संजय बोरा, खजिनदार दादाआढाव, राजेंद्र कदम, जावेद फरास इत्यादी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

