पिंपरी :देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनीनी फटाके वाजवून निकालाचे स्वागत केले. यावेळी संस्थेच्या सचिव आरती राव, माजी स्थायी समिति अध्यक्ष अतुल शितोळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. चौधरी, श्री. चोपड़े, अविनाश मारणे, तेजल कोळसे पाटील, आशा घोरपड़े, हर्षा बाठिया, विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला, अशा शब्दात संस्थेच्या सचिव आरती राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निकाल न्यायव्यावस्थेवरील विश्वास दृढ़ करणारा आहे. न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसेल. वरिष्ठ न्यायालयातही हा निकाल कायम राहवा. त्यामुळे आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहिल, याची जबाबदारी सरकारची आहे. तसेच महिला अत्यचाराबाबतच्या इतर खटल्याचा निकालही जलदगतीने लागण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही आरती राव यांनी व्यक्त केली.
माजी स्थायी समिति अध्यक्ष अतुल शितोळे म्हणाले, ही दुर्दैवी घटना होती. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मराठे मोर्चे निघाले. तपास यंत्रणानी केलेला कसुन तपास आणि सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी मांडलेली बाजू, यामुळे नराधमांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे तपास यंत्रणा आणि ऍड. उज्ज्वल निकम यांना धन्यवाद द्यायला हवेत. वाईट प्रवृत्तीचे लोक या शिक्षेमुळे गुन्हा करताना दहावेळा विचार करतील. हा निकाल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा पराजय आहे. फाशीच्या शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसेल. वरिष्ठ न्यायालयातही हा निकाल कायम राहवा. त्यामुळे आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहिल, याची जबाबदारी सरकारची आहे.