पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबला केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीची भेट

Date:

पुणे, दि.१३:- पुणे मेट्रोच्या स्वारगेट मल्टी मोडल हबच्या पर्यावरण मान्यता मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण समितीने भेट देवून पाहणी केली.

पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, सदस्य श्री. मुकुंद पाठक, सदस्य श्री. किरण आचरेकर, सदस्या डॉ. असीम हरवंश आणि सदस्य डॉ दत्तात्रय थोरात उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये स्वारगेट हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. स्वारगेट स्थानकामध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळाचे आणि पीएमपीएमएल चे मोठे बस स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांना जोडण्यासाठी मेट्रोने स्वारगेट येथे मल्टी मोडल हब उभारण्याचे योजिले आहे, जेणेकरून एसटी  बसने आलेले प्रवासी, पीएमपी एमएलचा वापर करणारे प्रवासी, रिक्षा, कार, रेडिओ टॅक्सी इ. वाहनांचा एकत्रित विचार करून तसेच त्यांचे सुचर आवागमन होण्यासाठी मल्टी मोडल हबचे नियोजन केले आहे.
मल्टी मोडल हबसाठी आणि तेथे बांधण्यात येणाऱ्या व्यावसायिक बांधकामासाठी पर्यावरण विभागाची मान्यता अपरिहार्य आहे. पर्यावरण मान्यतेसाठी महामेट्रोने केंद्र शासनाच्या पर्यावरण समिती ला योग्य त्या कागदपत्रांसहित अर्ज केला होता.

पर्यावरण समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर, सदस्य श्री. मुकुंद पाठक, सदस्य श्री. किरण आचरेकर, सदस्या डॉ. असीम हरवंश आणि  सदस्य डॉ  दत्तात्रय थोरात यांनी स्वारगेट मल्टी मोडल हबच्या कामाचे निरीक्षण केले.महामेट्रोचे संचालक श्री. अतुल गाडगीळ यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सांगितली. त्याचबरोबर महामेट्रो पर्यावरण संवर्धनासाठी ज्या उपाय- योजना करत  आहे त्याची माहिती सांगितली. समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महत्वाच्या सूचना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कार्यकारणीच्या इतर सदस्यांनीदेखील महत्वाचे मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...