भारतातील फसवणूक करणाऱ्यांचे लक्ष 2021च्या मध्यास होणाऱ्या घडामोडींवर

Date:

मुंबई, २७ सप्टेंबर२०२१ – विविध व्यवसाय आणि ग्राहक यांची डिजिटल स्वरुपातील फसवणूक करण्याचे प्रयत्न जगभरात सध्या वाढत आहेत. अशा वेळी, भारतातही अशी फसवणूक करणाऱ्यांचे लक्ष आर्थिक सेवा, प्रवास, विश्रांती, समुदायविषयक (ऑनलाईन मंच) आणि लॉजिस्टिक्स उद्योग या क्षेत्रांकडे वळले आहे. ट्रान्सयूनियन (NYSE: TRU) या संस्थेच्या नवीन त्रैमासिक विश्लेषणात हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

२०२० व २०२१ या दोन्ही वर्षांतील दुसऱ्या तिमाहींची तुलना केली असता, जगभरातील उद्योगांमध्ये डिजिटल फसवणुकीच्या संशयास्पद प्रयत्नांचे प्रमाण 16.5 टक्क्यांनी वाढले आहे, असे दिसून येते. भारतातून येणाऱ्या व्यवहारांसाठी डिजिटल फसवणुकीच्या प्रयत्नांची टक्केवारी याच कालावधीत 49.20 टक्क्यांनी दराने कमी झाली.

२०२१ व २०२२ या वर्षांतील दुसऱ्या तिमाहींची तुलना केल्यास, गेमिंग आणि प्रवास व विश्रांती या दोन क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर संशयास्पद डिजिटल फसवणुकीचे प्रयत्न सर्वात जास्त प्रमाणात झाल्याचे आढळते. गेल्या वर्षभरात त्यांत अनुक्रमे ३९३.० टक्के आणि १५५.९ टक्के इतकी वाढ झाली आहे. या समान कालावधींची तुलना करताना भारतात उद्भवलेल्या व्यवहारांसाठी, हा दर गेमिंगमध्ये 53.97 टक्के आणि प्रवास व विश्रांती यांमध्ये 269.72 टक्के इतक्या प्रमाणात वाढल्याचे दिसते.

जुगार, गेमिंग, आर्थिक सेवा, आरोग्य सेवा, विमा, रिटेल आणि प्रवास व विश्रांती यांसारख्या विविध उद्योगांमधील व्यवसायांनी नोंदवलेल्या डिजिटल फसवणुकीच्या प्रयत्नांवर ट्रान्सयूनियन नजर ठेवून आहे. अब्जावधी व्यवहार, तसेच ४० हजारांहून अधिक वेबसाईट्स व अॅप्स यांवर लक्ष ठेवून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ‘ट्रान्सयूनियन ट्रूव्हॅलिडेट’ हा फसवणूक विश्लेषण सोल्यूशनचा लंच, प्रमुख ओळख पडताळणी व जोखीम-आधारीत प्रमाणीकरण यांमध्ये ही माहिती साठवलेली असते. या वेबसाईट्स व अॅप्समध्ये भारतासह जगभरातील विविध देशांमधून माहितीचा ओघ सतत येत असतो.

ट्रान्सयूनियनमधील ग्लोबल फ्रॉड सोल्यूशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष शाय कोहेन म्हणाले, “फसवणूक करणारे महाभाग दर काही महिन्यांनी आपले लक्ष एका उद्योगापासून दुसऱ्या उद्योगाकडे वळवत असतात. ज्या उद्योगांमध्ये व्यवहारांचे प्रमाण वाढत असते, त्यांत संधी शोधण्याचा त्यांचा कल असतो. या तिमाहीत, अनेक देशांनी कोविड-19ची टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात केली आणि प्रवास व विश्रांती यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांनी या क्षेत्राला आपले प्रमुख लक्ष्य बनविले. गेमिंग या उद्योगाची बाजारपेठदेखील वाढत आहे. फसवणूक करणाऱ्यांनी या उद्योगाकडेही आपले लक्ष केंद्रित केले.”

फसवणूक करणाऱ्यांच्या लक्ष्यामध्ये अचानक बदल झाल्याचे उदाहरण  वित्तीय सेवा या क्षेत्रात पाहता येते. 2021च्या पहिल्या चार महिन्यांची आणि 2020च्या शेवटच्या चार महिन्यांची तुलना केली असता, जागतिक वित्तीय सेवेतील ऑनलाइन फसवणुकीच्या प्रयत्नांमध्ये 149 टक्के वाढ झाल्याचे दिसते; तथापि, २०२१ व २०२० या दोन महिन्यांतील दुसऱ्या तिमाहींची तुलना करताना, ऑनलाइन वित्तीय सेवा क्षेत्रातील फसवणुकीच्या संशयास्पद प्रयत्नांचे प्रमाण अजूनही जागतिक पातळीवर वाढत असल्याचे दिसते. अर्थात हे वाढीचे प्रमाण 18.8 टक्के इतके कमी आहे. भारतातून येणाऱ्या व्यवहारांसाठी या दोन कालावधींची तुलना केली असता, हा दर 15.35 टक्क्यांनी कमी झाला आहे. वित्तीय सेवा उद्योगाने फसवणूक नियंत्रण उपाययोजना कडकपणे अवलंबिली असल्याचे यातून दिसून येते.

भारतातून येणाऱ्या उद्योगांमध्ये २०२१ या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये होणारे संशयास्पद डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांचे मागील वर्षाच्या तुलनेतील प्रमाणत्यातील वाढ व घट.

उद्योगसंशयास्पद फसवणुकीच्या टक्केवारीतील बदलफसवणुकीचे प्रकार
टक्केवारीतील मोठी वाढ
प्रवास व विश्रांती269.72 टक्केक्रेडिट कार्डमधील फसवणूक
समुदायविषयक (ऑनलाईन डेटिंगमंचआदी)267.88 टक्केचुकीचे प्रोफाईल ठेवणे
लॉजिस्टिक्स94.84 टक्केशिपिंगमधील फसवणूक
टक्केवारीतील मोठी घट
दूरसंचार-96.64 टक्केखरी ओळख लपविणे
रिटेल-24.88 टक्केचुकीची माहिती देणे
जुगार-31.53 टक्केपॉलिसी / परवाना करार यांचे उल्लंघन

“कोरोना साथीच्या काळात समुदायविषयक (उदा. ऑनलाईन डेटिंग) आणि लॉजिस्टिक्सची आवश्यकता असणारे ऑनलाईन रिटेल व्यवहार यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. फसवणूक करणाऱ्यांनी ही गोष्ट ओळखली. भारतात टाळेबंदीनंतरच्या सध्याचा काळात, उद्योग-धंदे पुन्हा सुरू झाले आणि प्रवास व विश्रांती यांचे प्रमाण वाढले. या क्षेत्रातील व्यवहार वाढले. फसवणूक करणाऱ्यांनी या गोष्टींना लक्ष्य केले असून ते गैरफायदा घेऊ लागले आहेत,” असे शाय यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, “फसवणूक करणाऱ्यांनी ग्राहकांना लक्ष्य करणे सुरू ठेवल्याने, ग्राहकांचा विश्वास गमवावा लागू नये, यासाठी व्यावसायिकांना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आपले व्यवहार पुरेशा सुरक्षितपणे होत असल्याची ग्राहकांना खात्री पटावी, मात्र त्याचवेळी त्यांच्या व्यवहारांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होऊ नयेत, ते सुरळीत सुरू राहावेत, याची खातरजमा व्यावसायिकांना करावी लागत आहे. ग्राहकांनी खरेदीची प्रक्रिया मध्येच सोडून देऊ नये, यासाठी व्यावसायिकांना सजग राहावे लागत आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...