पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप’तर्फे आपल्या १९व्या स्थापनादिन वर्धापनाचे औचित्य साधून भारत व परदेशांतील नामवंत व्यक्तींना त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स २०१७’ पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आले. ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या बावधन कॅम्पसमध्ये अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या समारंभात हे पुरस्कार श्री. शेखर दत्त (छत्तीसगडचे माजी राज्यपाल, निवृत्त आयएएस, एसएम व भारत सरकारचे राष्ट्रीय सचिव), एम. एस. बिट्टा (अध्यक्ष – ऑल इंडिया अँटी-टेररिस्ट फ्रंट (एआयएएफ)), आणि प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर कलाकार हरीश भीमाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या सातत्यपूर्ण उपक्रमाचे यंदा हे १५ वे वर्ष असून त्यानिमित्त ‘सूर्यदत्ता नॅशनल लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड्स’ आणि ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स’ या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. हे पुरस्कार ‘सूर्यदत्ता ग्रुप’ विविध श्रेणींत राबवत असलेल्या अभ्यासक्रमांशी संबंधित आहेत. फॅशन डिझाईन, ब्युटी अँड वेलनेस, इंटेरियर डिझाईन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, स्पोर्ट्स अँड फिटनेस, बिझनेस मॅनेजमेंट, हेल्थ सायन्स, सोशल सायन्स, पब्लिक सर्व्हिस, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, ब्रेव्हरी आदी श्रेणींचा यात समावेश आहे. सूर्यदत्ता शिक्षण संस्थांत या विद्याशाखांत विविध अभ्यासक्रमांना शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त व्यक्तीमत्त्वांशी संवादाची संधी मिळावी व या व्यक्तींपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने प्रोत्साहन म्हणून हे पुरस्कार दिले जातात.
यंदा हे पुरस्कार २३ नामवंत व्यक्तींना सन्मानपूर्वक देण्यात आले.
Ø ‘सूर्यदत्ता नॅशनल लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड्स २०१७ – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ – हा पुरस्कार रेव्ह. पूज्य आचार्या श्री चंदनाजी महाराजसाहेब यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने तो जैन युवाचार्या शुभमजी यांनी स्वीकारला.
Ø ‘सूर्यदत्ता नॅशनल लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड्स २०१७’ पुरस्काराच्या सन्मानार्थींमध्ये डॉ. संप्रसाद विनोद, विठ्ठलशेठ मणियार, श्री. प्रेम चोप्रा, श्री. विनोद गणात्रा, वास्तुविशारद ख्रिस्तोफर बेनिंजर, पद्मश्री शहनाझ हुसेन, डॉ. मंगला नारळीकर, श्री. कस्तुरीलाल जैन, पद्मश्री शमशाद बेगम, डॉ. दत्ता कोहिनकर पाटील, श्री. शांतिलाल कटारिया, श्री. महाराज कृष्ण कौशिक, श्री. किशन शर्मा यांचा समावेश होता. Ø ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड्स २०१७’ हा पुरस्कार डॉ. अविनाश पोळ, श्री. समीर धर्माधिकारी, श्री. संदेश नवलाखा, श्री. झाकीर हुसेन, श्री. सुहास खामकर, श्री. विवेक खटावकर यांना देण्यात आला.
Ø ‘सूर्यदत्ता ग्लोबल ॲवॉर्ड्स २०१७’ हा पुरस्कार श्रीमती नीता रामचंद दुलाराम (बाली – इंडोनेशिया) यांना देण्यात आला.
Ø ‘सूर्यदत्ता नॅशनल यंग अचिव्हर ॲवॉर्ड्स २०१७’ या पुरस्काराने झोफा अफरोज (मुंबई), रहमान खान (नवी दिल्ली) यांना गौरवण्यात आले.
डॉ. दत्ता कोहिनकर पाटील यांना मूल्याधारित शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ‘सूर्यदत्ता लाईफटाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड’ देण्यात आला. ते म्हणाले, की यशस्वी होण्यासाठी आधी उत्तम माणूस बनणे गरजेचे असते. जी व्यक्ती आपल्या मनावर विजय मिळवते ती महान योद्धा असते. आपण आपले आयुष्य हसत-खेळत स्वीकारले पाहिजे. मी मराठी कवितेच्या दोन ओळी उद्धृत करतो. ‘कोण म्हणतो, आयुष्य एक डंख आहे? ते तर फुलपाखराचे पंख आहेत.’
टीव्ही आणि भारतीय चित्रपट क्षेत्रातील नैपुण्यासाठी ‘सूर्यदत्ता नॅशनल ॲवॉर्ड’ मिळाल्यानंतर अभिनेता समीर धर्माधिकारी म्हणाला, की मी नेहमी कामाच्या मागे धावत राहिलो आणि त्यामुळे समृद्धी आणि यश माझ्यामागे आपोआप धावत आले.
रेव्ह. पूज्य आचार्या श्री चंदनाजी महाराजसाहेब आणि युवाचार्या शुभमजी या दोघीही मुलांमध्ये मूल्याधारित शिक्षण रुजवण्यात कार्यमग्न आहेत. पूज्य आचार्या श्री चंदनाजी महाराजसाहेब यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर युवाचार्या शुभमजी म्हणाल्या, की आपल्या आंतरिक पालटासाठी जागृत राहा आणि प्रत्येक बालकामध्ये मूल्याधारित शिक्षण व संस्कार रुजवा.
‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षक व गुरु प्रा. शरद दराडे (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे) यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, की तुम्ही सातत्याने, संपूर्ण समर्पिततेने आणि ध्येयकेंद्रित होऊन मेहनत केलीत तर तुम्हीही आजच्या पुरस्कारार्थींप्रमाणे नामवंत व्यक्ती बनू शकाल आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असे पुरस्कार प्राप्त होतील.
ते पुढे म्हणाले, की केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर आमच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही त्यातून प्रेरणा व मूल्यवर्धनाचा लाभ होईल आणि तेही आपापल्या क्षेत्रांत असे आदर्श व्यक्तीमत्त्व बनण्याचा प्रयत्न करतील. अगदी थोड्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना या व्यक्तीमत्त्वांकडून प्रेरणा मिळाली, आणि त्यांनी स्वतःत परिवर्तन घडवून आणले तरी ते आपल्या क्षेत्रात खास स्थान प्राप्त करतील, याची आम्हाला खात्री आहे.

