आचार्य ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामी यांना ‘सूर्यरत्न – आधुनिक युगाचे
संत’ पुरस्कार जाहीर
संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, प्रसिद्ध आविष्कारक डिझायनर दिलीप
छाब्रिया, पद्मभूषण उदित नारायण, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले
तसेच अशा १० ख्यातनाम व्यक्तींना सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार जाहीर
पुणे : ” दरवर्षी प्रमाणे सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटने जीवन गौरव व राष्ट्रीय
पुरस्कार जाहीर केले आहेत. यावर्षी आचार्य ब्रम्हऋषी गुरुवानंद
स्वामी यांना ‘सुर्यरत्न – आधुनिक युगाचे संत’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार
आहे. तसेच, सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार साहित्यिक क्षेत्रामध्ये प्रभावशाली
कामगिरी करणारे पद्मभूषण डॉ. सत्यव्रत शास्त्री, निवृत्त न्यायाधीश
परशुराम सावंत, संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, पद्मभूषण पं. राजन
आणि साजन मिश्रा, प्रसिद्ध आविष्कारक डिझायनर दिलीप छाब्रिया,
दूरचित्रवाणी पत्रकार डॉली ठाकोरे, पद्मभूषण गायक उदित नारायण, ज्येष्ठ
अभिनेते विक्रम गोखले, जागतिक व्यावसायिक मोतीलाल ओसवाल यांना जाहीर
करण्यात येत आहेत. हे पुरस्कार ७ फेब्रुवारी म्हणजेच सूर्यदत्ताच्या १८ व्या वर्धापन
दिनी दिले जाणार आहेत.” अशी माहिती सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे
संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.-
सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिट्युटतर्फे गत १७ वर्षांपासून जीवन गौरव व राष्ट्रीय
पुरस्कार विविध क्षेत्रातील दिग्दजांना दिले जातात. यावेळचे राष्ट्रीय
पुरस्कार रुईया ग्रुपचे पवनकुमार रुईया (व्यावसायिक-सामाजिक जबाबदारीतील
योगदानसाठी), नाझ फाउंडेशनच्या अंजली गोपालन (सामाजिक न्याय
व्यवस्थेतील योगदानसाठी), राजेंद्र मेहता(सामाजिक धार्मिक
विकासामधील योगदानसाठी, समाजभूषण), सुधीर गोयल(कॉर्पोरेट
क्षेत्रामधील योगदानसाठी), प्रदीप लोखंडे(ग्रामीण विकास
क्षेत्रातील योगदानसाठी), विवेक वेलणकर (स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक कार्य
क्षेत्रातील योगदानसाठी),अमृता फडणवीस(बँकिंग क्षेत्रातील योगदानासाठी),लीना
मोगरे (आरोग्य आणि फिटनेस क्षेत्रामधील योगदानसाठी), रणजीत जगताप
(वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील योगदानसाठी), मानवेंद्रसिंग गोहिल(सामाजिक सेवा
क्षेत्रातील योगदानसाठी), नीलाद्री कुमार (शास्त्रीय संगीत वाद्य
क्षेत्रातील योगदानसाठी), दिनेश नाथानी(प्रेरणादायी प्रशिक्षण
क्षेत्रातीलयोगदानसाठी), सायली आगवणे (दिव्यांग मुलांसाठी प्रेरणा ठरलेली
कलाक्षेत्रातमधील योगदानासाठी) यांना देऊन सन्मानित केले जाईल.
“विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारया लोकांना गौरवणे त्यांचा सन्मान
करणे यात एक आनंद दडला आहे. अशा लोकांचा सन्मान केल्याने सूर्यदत्ता ला
स्वत: सन्मानित झाल्या सारखे वाटते. ज्या लोकांचा याप्रसंगी सन्मान केला
जाणार त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्व शिक्षकांनी
व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन कार्य करावे ही आमची इच्छा आहे.”
अशी भावना डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या पुरस्कारांचे वितरण सूर्यदत्ता कॅम्पस, बावधन येथे सायंकाळी ५ ते ९
यावेळेत होणार आहे. यावेळी आचार्य ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामी हे प्रमुख पाहुणे
म्हणून तर अॅक्सिस बँकेच्या सहकारी उपाध्यक्ष अमृता फडणवीस ह्या सन्माननिय
अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्याम
जाजू , ऑल इंडिया अॅन्टी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा हे विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, हे पुरस्कार सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे
संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया तसेच उपसंचालक सुषमा चोरडिया
इत्यादी प्रमुख व्यक्तींच्या हस्ते देण्यात येणार आहेत. पुरस्कार धारकांना स्मृतिचिन्ह
व शाल देऊन सन्मानित करण्यात येईल.
“सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूट्स तर्फे १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुर्योत्सव साजरा
केला जातो. यात विद्यार्थ्यांकडून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, खेळ विषयक व
अन्य शिक्षणोत्तर कौशल्ये सादर केले जातात. विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासासाठी
व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.” अशी माहिती
सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे कार्यकारी संचालक प्रा. एन. सी. सेठिया यांनी
दिली.

