टी साई जान्हवी, संजना देवीनेनी, सोहिनी मोहंती यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

मुंबई,  18 मार्च, 2021 :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित एआयटीए एमएसएलटीए 14वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या सोहिनी मोहंती, कर्नाटकाच्या टी साई जान्हवी व संजना देवीनेनी यांनी मानांकित खेळाडूंवर  विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स व वुडहाऊस जिमखाना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात ओरिसाच्या बिगरमानांकीत सोहिनी मोहंती हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सहाव्या मानांकित तेलंगणाच्या कनूमुरी इकराजूचा 6-4, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या सातव्या मानांकित संजना देवीनेनी हिने चौथ्या मानांकित उत्तराखंडच्या सौमित्रा वर्माचा 6-4, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. कर्नाटकाच्या टी साई जान्हवी हिने दहाव्या मानांकित तेलंगणाच्या लक्ष्मी दांडूचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव केला. महाराष्ट्राच्या आस्मि आडकर हिने आपलीच राज्य सहकारी ऐश्वर्या जाधवचा 6-1, 6-4 असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले. 
मुलांच्या गटात तामिळनाडूच्या अव्वल मानांकित प्रणव रेथीन आरएसने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तेलंगणाच्या सहाव्या मानांकित वेंकट बटलंकीचा 6-2, 6-0 असा तर तिसऱ्या मानांकित हरियाणाच्या तेजस आहुजाने मणिपूरच्या सातव्या मानांकित सेंजम अश्वजीतचा 6-3, 6-4 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीने महाराष्ट्राच्या अर्णव पापरकरचा टायब्रेकमध्ये 2-6, 7-6(5), 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव केला. 
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या अर्णव पापरकर व वेदांत भसीन या जोडीने चौथ्या मानांकित अंतरिक्ष तमुली व अश्वजित सेंजम या जोडीवर 4-5, 5-4, 10-6 असा सनसनाटी विजय मिळवला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व(मुख्य ड्रॉ)फेरी: मुले:प्रणव रेथीन आरएस(तामिळनाडू)(1)वि.वि.वेंकट बटलंकी(तेलंगणा)(6)6-2, 6-0;  तेजस आहुजा(हरियाणा)(3)वि.वि.सेंजम अश्वजीत(मणिपूर)(7) 6-3, 6-4;महालिंगम खांदवेल(तामिळनाडू)(5)वि.वि.श्री प्रणव तम्मा(तेलंगणा) 6-1, 6-2; क्रिश त्यागी(कर्नाटक)(2) वि.वि.अर्णव पापरकर(महाराष्ट्र)2-6, 7-6(5), 6-0;   मुली:
आस्मि आडकर(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्या जाधव(महाराष्ट्र)6-1, 6-4;  टी साई जान्हवी(कर्नाटक)वि.वि.लक्ष्मी दांडू(तेलंगणा)(10)6-3, 6-4; संजना देवीनेनी(कर्नाटक)(7) वि.वि.सौमित्रा वर्मा(उत्तराखंड)(4) 6-4, 6-1; सोहिनी मोहंती(ओरिसा)वि.वि.कनूमुरी इकराजू(तेलंगणा)(6)6-4, 6-3;दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले: 
प्रणव रेथीन आरएस/साम्प्रीत शर्मा(1) वि.वि.रूरिक रजनी/व्रज गोहिल 4-1, 5-3;
अर्णव पापरकर/वेदांत भसीन वि.वि.अंतरिक्ष तमुली/अश्वजित सेंजम(4) 4-5, 5-4, 10-6;
तेजस आहुजा/सिद्धांत शर्मा(3) वि.वि.शुभम शेरावत/अर्जुन पंडित 4-0, 4-2;
वेंकट बटलंकी/क्रिश त्यागी(2) वि.वि.हितेश चौहान/अक्षत धूल 4-2, 4-0;

मुली:
रिशीता बासिरेड्डी/टी साई जान्हवी वि.वि.साईजयानी बॅनर्जी/वामिका शर्मा 4-1, 5-4(5);
मानसी सिंग/सोहिनी मोहंती वि.वि.वरलिका श्री/लक्ष्मी दांडू 1-4, 4-2, 10-5;
कनूमुरी इकराजू/ऐश्वर्या जाधव वि.वि.संजना देवीनेनी/सर्वा किलारू(3) 5-4(0), 4-1;
प्रार्थना सोळंकी/प्रियांका राणा वि.वि.माहिका खन्ना/शगुन कुमारी 5-4(3), 4-1.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...