पुणे– पीवा
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत टेनिस अॅक्सेस संघाने पर्ल्स संघाचा १८-०५असा सहज पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून शायनी बरेटो, संजय आशर, महा पार्था, विक्रम गोलाणी, अंकित डागा, हरशरण सिंग गुप्ता यांनी अफलातून कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात नितीन सिंघवी, राम नायर, अतुल मांडवकर, बिनेश राजन, हिमांशू कपटिया, कुमार कोंकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ओडीएमटी संघाने बालेवाडी बॉम्बर्सचा १८-१३असा संघर्षपूर्ण पराभव केला. अन्य लढतीत लॉ कॉलेज संघाने बालेवाडी एसर्सचा १४-११ असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
टेनिस अॅक्सेस वि.वि.पर्ल्स १८-५(टाय १: ८०अधिक गट: शायनी बरेटो/संजय आशर वि.वि.शशांक परांजपे/आनंद सुलाखे ६-२; टाय २: महा पार्था/विक्रम गोलाणी वि.वि.संजय बोथ्रा/मोहन भंडारी ६-१; टाय ३: अंकित डागा/हरशरण सिंग गुप्ता वि.वि.डॉ.चोभे/डॉ.यार्डी ६-२);
ओडीएमटी वि.वि.बालेवाडी बॉम्बर्स १८-१३(टाय १: ८०अधिक गट: नितीन सिंघवी/राम नायर वि.वि.मनू नांजेगौडा/अनंत ६-५(७-४); टाय २: अतुल मांडवकर/बिनेश राजन वि.वि.नरेंद्र सोपल/समीर भाम्ब्रे ६-४; टाय ३: हिमांशू कपटिया/कुमार कोंकर वि.वि.उमेश माने/निर्मल वाधवानी ६-४);
लॉ कॉलेज वि.वि.बालेवाडी एसर्स १४-११(टाय १: ८०अधिक गट: नरेश अरोरा/गिरीश राव पराभूत वि.सुधीर पिसाळ/निरव देसाई २-६; टाय २: केतन जाठर/तारक पारीख वि.वि.विक्रांत सुर्वे/सुजित बालन ६-१; टाय ३: अभिजित मराठे/शिवाजी यादव वि.वि.दीपक पाटील/कुमार सीबी ६-४).
हिलसाईड जिमखाना पुढे चाल वि डेक्कन जिमखाना 18-0