औरंगाबाद- एन्ड्युरन्स् मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स् सनराईज् 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकरने महाराष्ट्राच्याच सुदिप्ता कुमारचा तर, मुलांच्या गटात छत्तीसगडच्या क्रिशन हुडाने आसामच्या उदित गोगईचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस् कॉम्पलेक्स् येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलींच्या गटात पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकरने सनसनाटी निकालाची नोंद करत अव्वल मानांकीत महाराष्ट्राच्या सुदिप्ता कुमारचा एक तास तीस मिनिट चाललेल्या सामन्यात 3-6,6-1,6-1 असा पराभव करत विजेपद पटकावले. ऋतुजा चाफळकरने नैशा श्रीवास्तवच्या साथीत रेनी सिंगला व रेनी सिंग यांचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले. 13 वर्षीय ऋतुजाने ऑक्टोंबर मध्ये झालेल्या फेनेस्टा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
13 वर्षीय ऋतुजा पुणे येथे डीईएस इंग्लिश मिडियम शाळेत आठवी इयत्तेत शिकते.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मनांकित छत्तीसगढच्या क्रिशन हुडाने आसामच्या दुस-या मानांकीत उदित गोगईचा 6-1,7-5 पराभव करून विजेतेपद पटकावले. क्रिशनचे हे या वर्षातील सातवे विजेतेपद आहे. दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन्ड्युरन्स् ग्रुप(हेड कॉर्पोरेट अफेअर्स)चे अनिल इरावने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एन्ड्युरन्स् ग्रुपचे हर्षल शर्मा, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, फिजिओ डॉ. आश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले आणि वरुण मांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण एन्ड्युरन्स् ग्रुपच्या प्रमुख वर्षा जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल इरावने(हेड कॉर्पोरेट अफेअर्स), एन्ड्युरन्स् गुरुपाचे हर्षल शर्मा, स्पर्धा निरीक्षक वैशाली शेकटकर, फिजिओ डॉ. आश्विनी जैस्वाल, आशुतोष मिश्रा, प्रवीण गायसमुद्रे, गजेंद्र भोसले आणि वरुण मांगीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी- मुले
क्रिशन हुडा(छत्तीसगढ)(1) वि.वि.उदित गोगई(आसाम)(2) 6-1,7-5
मुली:
ऋतुजा चाफळकर(महा)(5)वि.वि. सुदिप्ता कुमार(महा)(1) 3-6,6-1,6-1

