तिसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी-आयकॉन कुमार लिटल चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत अभिराम निलाखे, देवांशी प्रभुदेसाई यांना विजेतेपद

Date:

पुणे, 17 फेबुवारी 2021: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील तिसऱ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021  स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अभिराम निलाखे याने तर, मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले. 

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित अभिराम निलाखे याने विश्वजीत सणसचा 4-0, 4-1  असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. अभिराम हा बाळकृष्ण मंदिर येथे सातवी इयत्तेत शिकत असून पार्थ चिवटे टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक पार्थ चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे हे या वर्षातील या गटातील दुसरे विजेतेपद आहे. 

मुलींच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाई हिने दुर्गा बिराजदारचा 4-0, 4-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राऊत आणि स्पर्धा निरीक्षक रेशम रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:

विश्वजीत सणस वि.वि.अद्विक नाटेकर(1) 6-5(5); 

अभिराम निलाखे(2) वि.वि.मनन अगरवाल 7-0;

अंतिम फेरी: अभिराम निलाखे(2) वि.वि.विश्वजीत सणस 4-0, 4-1; 

14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:

देवांशी प्रभुदेसाई(3)वि.वि.मृणाल शेळके 7-4;

दुर्गा बिराजदार वि.वि.क्षीरीन वाकलकर(4)7-5; 

अंतिम फेरी: देवांशी प्रभुदेसाई(3)वि.वि.दुर्गा बिराजदार 4-0, 4-1.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...