पुणे- एक्सेलार स्पोर्टस् अॅड एन्टरटेमेंट प्रायव्हेट लिमिटेड व पुणे जिल्हा कबड्डी संघटना यांच्या सहकार्याने ओयोजित सृजन सुपर 20 युथ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागात मुलांच्या गटात आदिनाथ कबड्डी संघ, आराध्या प्रतिष्ठान, राकेशभाऊ घुले संघ, कालभैरवनाथ कबड्डी संघ यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला
पिंपरी चिंचवड येथील ज्ञान प्रबोधीनी शाळा, निगडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आदिनाथ कबड्डी संघने भैरवनाथ कबड्डी संघाचा 34-21 तर आराध्या प्रतिष्ठान संघाने शिवाजी उदय मंडळ संघाचा 36-17 असा पराभव करत आगेकुच केली. राकेशभाऊ घुले संघाने ब्रम्हा विष्णु महेेश संघाचा 36-34 असा तर कालभैरवनाथ कबड्डी संघ संघाने मोरया कबड्डी संघाचा 35-12 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मुले- उपांत्यपुर्व फेरी
आदिनाथ कबड्डी संघ- 34 वि.वि भैरवनाथ कबड्डी संघ 21
आराध्या प्रतिष्ठान – 36 वि.वि शिवाजी उदय मंडळ 17
राकेशभाऊ घुले संघ- 36 वि.वि ब्रम्हा विष्णु महेेश 34
कालभैरवनाथ कबड्डी संघ- 35 वि.वि मोरया कबड्डी संघ 12

