रॉबर्ट लिंस्टेड व जोनाथन एरलीच टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या दुहेरीचे खास आकर्षण

Date:

दोन्ही खेळाडू माजी ग्रँडस्लॅम विजेते
 
पुणे: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी स्टेडीयम मध्ये 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र या आशियातील एकमेव एटीपी टूर टेनिस स्पर्धेतील दुहेरी गटात रॉबर्ट लिंस्टेड व जोनाथन एरलीच हे माजी ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू खास आकर्षण ठरणार आहेत.
 
स्वीडनच्या लिंस्टेड याने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. तसेच, त्याने 2010, 2011 व 2012 अशी सलग तीन वर्षे विम्बल्डनची अंतिम फेरीदेखील गाठली होती. टाटा ओपन स्पर्धेत तो हॉलंडच्या रॉबिन हॅसे च्या साथीत विजेतेपदासाठी जबरदस्त आव्हान उभे करणार आहे. विश्वक्रमवारीत 34व्या स्थानावर असलेल्या हॅसेने 2018 मध्ये हॉलंडच्याच मॅटवे मिडलकूपच्या साथीत टाटा ओपन टेनिस स्पर्धेमध्ये दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. 
 
इस्राईल एलरीचनेही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2008 मध्ये जिंकली होती. जागतिक मानांकनात 67व्या क्रमनावर असलेला एरलीच टाटा ओपन टेनिस स्पर्धेत प्रथमच खेळणार असून बेलारूसचा आंद्रेई व्हेसिलोव्हासकी हा त्याचा दुहेरीतील जोडीदार असणार आहे.
 
गतवर्षी रोहन बोपन्नाच्या साथीत टाटा ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद पटकावणारा भारताचा दिविज शरण यंदा न्यूझीलंडच्या आरटेम सीताकच्या साथीत विजेतेपद राखण्यासाठी उत्सुक असेल. 
 
अधिक माहिती देताना टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे हे 25 वर्ष असून अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. आम्ही 10 जोडयाना दुहेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये थेट प्रवेश दिला असून चार जोड्याना स्पर्धेच्या ठिकाणीच प्रवेश देण्यात येणार आहे आणि दोन जोडयाना वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश देण्यात येणार आहे. 
 
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, यंदाच्या वर्षी चुरशीची स्पर्धा होणार असून जगांतील अव्वल दर्जाचे खेळाडू सहभागी होत असल्याने टेनिस शौकिनांना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळेल, अशी खात्री वाटते. महान खेळाडू लिएन्डर पेससह रोहन बोपन्ना, पूरव राजा, रामकुमार रामनाथन आणि जीवन नेंदूचेझियन हे अव्वल भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ मध्ये खेळणार आहेत. 
 
दुहेरीच्या मुख्य ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूमध्ये एल साल्वाडोरचा मार्सेलो आरेव्हल्लो याचा समावेश असून तो इंग्लडच्या जॉनी ओ’मारा याच्या साथीत खेळणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...