पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत तेज ओक, शार्दूल खवळे, अर्णव बनसोडे, श्रावणी देशमुख यांचे विजय

Date:

पुणे- पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित व केपीआयटी-आयकॉन  ग्रुप प्रायोजित पीएमडीटीए मार्स्टस् टेनिस स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत मुलांच्या गटात तेज ओक, शार्दूल खवळे, अर्णव बनसोडे यांनी, तर मुलींच्या गटात श्रावणी देशमुख, रितिका मोरे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.  
 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत 12वर्षाखालील मुलांच्या गटात  पहिल्या सामन्यात तेज ओक याने शार्दूल खवळेचा 6-4 असा तर, दुसऱ्या सामन्यात तेजने आरुष मिश्राचा  6-0 असा सहज पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत अर्णव बनसोडेने अर्जुन कीर्तनेचा टायब्रेकमध्ये  6-5(4)असा पराभव केला. 
 
मुलींच्या गटात श्रावणी देशमुख हिने अनुक्रमे निशिता देसाईचा 6-2 असा व  अनन्या देशमुखचा 6-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली. सहाना कमलाकननने दुर्गा बिराजदारवर टायब्रेकमध्ये  6-5(1)असा विजय मिळवला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राउंड रॉबिन फेरी:
12वर्षाखालील मुले: 
गट 1: तेज ओक वि.वि.शार्दूल खवळे 6-4;  
गट 1: आरुष मिश्रा वि.वि.अर्जुन परदेशी 6-1; 
गट 1: शार्दूल खवळे वि.वि.अर्जुन परदेशी 6-0; 
गट 1: तेज ओक वि.वि.आरुष मिश्रा 6-0;  
गट 2: अर्णव बनसोडे  वि.वि. अर्जुन कीर्तने  6-5(4); 
गट 2: नीव कोठारी वि.वि.अमन शहा 6-2;
गट 2:अर्णव बनसोडे वि.वि.अमन शहा 6-5(5);
 
 
12वर्षाखालील मुली:
गट 1: श्रावणी देशमुख वि.वि.निशिता देसाई 6-2; 
गट 1: काव्या देशमुख वि.वि.अनन्या देशमुख 6-3;
गट 2: रितिका मोरे  वि.वि.मृणाल शेळके 6-3; 
गट 1: श्रावणी देशमुख वि.वि.अनन्या देशमुख 6-0;
गट 1: काव्या देशमुख वि.वि.निशिता देसाई 6-3;
गट 2: सहाना कमलाकनन वि.वि.दुर्गा बिराजदार 6-5(1).
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

किडनी विक्री प्रकरणातील सावकरांवर कधी कारवाई करणार? – वडेट्टीवार

मुंबई- विदर्भातील शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी किडनी विकवी लागल्याचा प्रकार...

DGCA कडून विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न:अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार...

घरकुल लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर मिळाली नाही,जनाची नाही तर मनाची ठेवा – वडेट्टीवार

मुंबई- राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन...

अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द:5 लाख घरांची वीज गेली, 153 वर्षांत पहिल्यांदाच वर्तमानपत्र छापले जाऊ शकले नाही

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेत जोरदार वाऱ्यांमुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे विमानतळावरील धावपट्ट्या...